आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटिश ट्रिम्‍फची लवकरच भारतीय बाजारात एंट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनची प्रसिद्ध ट्रिम्फ बाइक लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. 2012 च्या ऑटो एक्स्पोमध्ये हिचे सादरीकरण झाले होते. किंमत व इंजिन पाहता ही इतर बाइकला तगडे आव्हान ठरू शकते.

ही बाइक ब-याच उशिराने भारतीय बाजारात येत आहे. मात्र, या बाइकचा कारखाना बंगळुरूच्या जवळ असणा-या नरसापूर येथे सुरू होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे लवकरच या बाइकची असेम्ब्लिंग सुरू होण्याची शक्यता आहे.

यामध्ये सहभागी असणा-या एका प्रमुख सहका-यामुळे बाइकला विलंब होत आहे. कंपनी आता हिला स्वस्त सीकेडी मार्गाने आयात करण्याच्या विचारात आहे. 2013 च्या उत्सवांमध्ये ही बाइक बाजारात येण्याची अपेक्षा आहे. आता कंपनीने असेम्ब्लिंग सेंटर मानेसर येथे बनवले आहे. बाइकची किंमत इतर बाइकच्या किमतींबरोबर स्पर्धा करू शकते. हार्ले डेव्हिडसनसारख्या आधीच बाजारात असणा-या परदेशी बाइक्सना ट्रिम्फबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे.