आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारातील तेजीला लवकरच लागणार ब्रेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुपया सावरल्याने मागील आठवड्यात शेअर आणि इतर प्रमुख निर्देशांकांत तेजी दिसून आली. विकासाला महत्त्व देणा-या आर्थिक धोरणांच्या संकेतांचा परिणाम विदेशी मुद्रा बाजारात दिसून आला. विदेशी संस्थांनी केलेल्या खरेदीमुळे तेजीला बळ मिळाले. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारात मात्र काहीही मूलभूत बदल झालेले नाहीत. अमेरिकेतील रोजगारविषयक अपेक्षाभंग करणा-या आकडेवारीमुळे अमेरिका फेड रिझर्व्हच्या रोखे खरेदी प्रक्रियेत तेजी आणण्याची चिंता काही प्रमाणात कमी केली आहे.चीनमधील आकडेवारीने विदेशी चलन बाजारातील स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. सिरियावरील अमेरिकेची कारवाई तूर्त टळल्याचाही काही प्रमाणात फायदा झाला. थोडक्यात, सर्व विकसनशील किंवा उगवत्या अर्थव्यवस्थांतील स्थिती सुधारली आहे. ब्राझील आणि रशियाच्या अर्थव्यवस्थांना याचा सर्वाधिक लाभ झाला.


देशातील बाजार सध्या अल्पकालीन तेजीच्या स्थितीत आहे. सध्याची पातळी क्षमतेपेक्षा जास्त खरेदीची आहे. तांत्रिकदृष्ट्या लाभाची पातळी जास्त आहे. लवकरच बाजार सुदृढ होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तेजीला काही प्रमाणात ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तेजीच्या लाटेत शेअर बाजार वाहवत जाण्याची शक्यता असून त्यामुळे विदेशी चलन बाजारातही अस्थैर्य येऊ शकते. असे असले तरी गुंतवणूकदारही सध्या दक्ष राहतील. त्यांचे लक्ष आता औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि किरकोळ तसेच घाऊक महागाईच्या आकडेवारीकडे लागले आहे. हे दोन्ही आकडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. रिझर्व्ह बँकेच्या 20 सप्टेंबर रोजी नव्या गव्हर्नरांच्या नेतृत्वात होणा-या पतधोरण बैठकीवर याचा परिणाम दिसून येईल.


तांत्रिकदृष्ट्या निफ्टी सध्या 5898 या महत्त्वाच्या अडथळा पातळीवर आहे. या पातळीवर हा निर्देशांक सध्या स्थिरावतो आहे. अशा स्थितीत तांत्रिक करेक्शन येण्याची शक्यता आहे. निफ्टीने मोठ्या व्हॉल्यूमसह ही पातळी ओलांडल्यास त्याला 5,942 पातळीवर अडथळ्याची शक्यता आहे. या पातळीवरही काही प्रमाणात तेजी आणि तांत्रिक करेक्शन दिसण्याची शक्यता आहे. निफ्टीने ही पातळीही ओलांडली तर 6092 हे त्याचे पुढील लक्ष्य राहील.
खालच्या दिशेने निफ्टीला आता 5,756 अंकांवर तगडा आधार आहे. यावर बारकाईने नजर ठेवायला हवी. ही पातळी तुटल्यास मोठ्या प्रमाणावर विक्रीची शक्यता आहे. जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर राहील तोपर्यंत बाजारात तेजीचे वातावरण राहण्याची आशा आहे. निफ्टीला 5,815 अंकांवर मध्यम स्वरूपाचा अडथळा आहे.


शेअर्सच्या बाबतीत, या आठवड्यात ----टीव्ही नेटवर्क, हिंदाल्को इंडस्ट्रीज आणि झी एंटरटेनमेंट लिमिटेडचे समभाग चार्टवर उत्तम दिसताहेत. सन टीव्हीचा मागील बंद भाव 549.70 रुपये होता. त्याचे लक्ष्य 562 रुपये आहे, तर स्टॉप लॉस 537 रुपये आहे. हिंदाल्को इंडस्ट्रीजचा मागील बंद भाव 110.20 रुपये होता. त्याचे लक्ष्य 114 रुपये आहे, तर स्टॉप लॉस 106 रुपये आहे. झीचा मागील बंद भाव 229.10 रुपये होता. त्याचे लक्ष्य 237 रुपये आहे, तर स्टॉप लॉस 221 रुपये आहे.


- लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि
moneyvistas.com चे सीईओ आहेत.