आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Very Soon The Note Of Paper Will Be Out From The Market

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फाटक्या नोटांच्या कटकटीतून लवकरच सुटका; प्लास्टिक नोटा चलनात येणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- खिशात ठेवलेली नोट फाटली अथवा व्यवहारात चुकून एखादी फाटकी नोट आली तर ती खपवायची कशी? असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. परंतु आता काळजी करायची गरज नाही. आता लवकरच खराब आणि फाटक्या नोटांच्या कटकटीतून सुटका होणार आहे. केंद्र सरकारने प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष 2014 मध्ये या नोटा चलनात येतील. विशेष म्हणजे सुरुवातीला 10 रुपयांच्या प्लास्टिक नोटा चलनात येणार असल्याचे अर्थ राज्यमंत्री नमो नारायण मीना यांनी आज (शुक्रवार) सांगितले.

खासदार भूदेव चौधरी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नमो नारायण मीना म्हणाले, की केंद्र सरकारने प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरपर्यंत 10 रुपयांच्या प्लास्टिक नोटा चलनात येण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंक त्याबाबत संशोधन करीत आहे.

सुरुवातीला पाच निवडक शहरात 10 रुपयांच्या नोटा येतील. भौगोलिक, वातावरण विविधता लक्षात घेऊन 10 रुपयांच्या एक अब्ज प्लास्टिक नोट चलनात आणल्या जाणार आहेत. यात कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, प्लास्टिकच्या नोटा अधिक सुरक्षित...