आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हौशी डिझायनर डॉग नुगयेनचा मोबाइल गेम फ्लॅपी बर्डने अलीकडेच खळबळ माजवली होती. त्या वेळी निनटेंडोच्या अधिकार्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. व्हिएतनामी प्रोग्रामर नुगयेनने कॉपीराइट उल्लंघनाची शक्यता पाहता 125 वर्षे जुन्या जपानी गेमिंग फर्मच्या दबावाखाली गेम परत घेतला आहे, अशी अफवा पसरली होती. मात्र, तसे काही नसल्याचे निनटेंडोने टाइमला सांगितले. फ्लॅपी बर्ड मोफत गेम होता. तरी तो दिवसभरात जाहिरातीतून 50 हजार डॉलर कमावत होता. हा घटनाक्रम गेमिंग जगतात आलेल्या बदलाची आठवण करून देतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत निनटेंडोच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या गेम व्हीचा दबदबा होता.
विश्लेषकांच्या मते, मारियो, पोकेमॉन आणि जेल्डासारख्या चरित्र चितारणार्या निनटेंडोला अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर फ्लॅपी बर्ड, कँडी क्रशकडून धडा घेतला पाहिजे. कंपनीचा ‘व्ही’नंतर ‘व्हीयू’ चालला नाही. उत्पन्न घटले आहे. अगदी हाताने चालणार्या थ्री-डी एसची विक्री अपेक्षेसारखी झाली नाही. खरे म्हणजे लाखो लोक स्मार्टफोनवर गेम खेळत आहेत. लोकांना आता गेमिंग डिव्हाइसची गरज राहिली नाही. मॉर्निंग स्टारचे विश्लेषक लियांग फेंग सांगतात, पर्यायी प्लॅटफार्म समोर असल्यास स्पर्धेत टिकणे कठीण असते.
मी माझा पगार अर्ध्यावर आणीन, असे निनटेंडोचे अध्यक्ष सतोरू इवाटा यांनी सांगितले. चांगल्या जीवनशैलीचे ध्येय ठेवून कंपनी नवी उत्पादने बनवेल. मात्र, ते म्हणाले, आमची योजना मोबाइल डिव्हाइससाठी गेम रिलीझ करण्यासाठी नाही. कित्येक विश्लेषक मानतात, सोनी प्ले स्टेशन 4 किंवा मायक्रोसॉफ्टच्या एक्स बॉक्स वनसारख्या डिव्हाइसमधून त्वरित नफा कमावला जाऊ शकतो. इवाटा म्हणतात, कंपनीच्या गेमचा त्यांनी बनवलेल्या हार्डवेअरशीच चांगला मेळ जमतो. विश्लेषक मायकेल पेचटर म्हणतात, त्यांना वाटते की, त्यांचे हार्डवेअर अँपलच्या हार्डवेअरसारखे आहे.
व्हीयूची विक्री डळमळीत
रस्ता - मॉर्निंग स्टारच्या फेंग यांचे म्हणणे आहे की, 299 डॉलरच्या सिस्टिमचे मूल्य घटवण्याऐवजी त्याचे सॉफ्टवेअर मजबूत करायला हवे. व्हिवर मारियो कार्टच्या तीन कोटी 50 लाख कॉपी विकल्या गेल्या. मेमध्ये सादर झाल्यानंतर ते व्हीयूला पुढे करू शकते.
स्मार्टफोनने नुकसान
रस्ता - मारियोला स्मार्टफोनवर टाकल्यास त्याच्या तीन डीएसला नुकसान होईल, अशी शंका निनटेंडो यांना आहे. पेचटर सुचवतात, निनटेंडो आपल्या गेमच्या दीर्घ कॅटलॉगला आयओएस आणि अँड्रॉइडवर टाकून नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो.
मुलांना टॅब्लेट आवडतात
रस्ता - व्हीयू फक्त कंट्रोलरच्या रूपात टॅब्लेटचा वापर करतात. निनटेंडो टच स्क्रीन पिढीसाठी आवश्यक तंत्रावर आधारित आपले डिव्हाइस तयार करू शकतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.