आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओकॉन डी 2 एचचा आयपीओ लवकरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डायरेक्ट टू होम सेवा पुरवणार्‍या व्हिडिओकॉन डी 2 एच कंपनीचा चालू आर्थिक वर्षात प्राथमिक समभाग विक्री प्रस्ताव (आयपीओ) आणण्याचा विचार असल्याचे कंपनीच्या उच्च पदस्थ अधिकार्‍याने गुरुवारी सांगितले.

सेबीकडून व्हिडिओकॉन डी 2 एचला आयपीओ आणण्याची परवानगी मार्च 2013 मध्ये मिळाली आहे. आयपीओच्या माध्यमातून 700 कोटी रुपये उभारण्याची कंपनी योजना आहे. मात्र, त्या वेळी बाजाराची स्थिती योग्य नसल्याने कंपनीने आयपीओ आणण्याची योजना पुढे ढकलली होती.