आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडीओकॉन डी 2 एच वर दोन नव्या वाहिन्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या व्हिडीओकॉन डी 2 एच सेवेत आता दोन नव्या वाहिन्यांची भर पडली आहे. वेनधर टीव्ही आणि चार्डिकला टाइम टीव्ही अशा या नव्या वाहिन्यांची नावे आहेत. वेनधर टीव्ही ही तामिळ भाषिक वाहिनी असून साउथ स्लिव्हर या बेसिक प्लॅनसोबत ती उपलब्ध आहे. आता व्हिडीओकॉन डी 2 एच वरील तामिळ वाहिन्यांची संख्या 53 वर पोहोचली आहे. चार्डिकला टाइम टीव्ही ही पंजाबी वाहिनी असून व्हिडीओकॉन डी 2 एच वरील पंजाबी वाहिन्यांची संख्या 12 वर पोहोचली आहे. व्हिडीओकॉन डी 2 एच चार्डिकला टाइम टीव्ही ही वाहिनी 762 क्रमांकावर तर वेनधर टीव्ही 817 क्रमांकावर उपलब्ध राहील.