मुंबई - ‘फोर जी’साठी व्हिडिओकॉन टेलिकॉम सज्ज झाली आहे. ही सेवा देण्यासाठी कंपनीने हुवेई टेक्नॉलॉजीजशी करार केला आहे. कंपनीकडून सातपैकी सहा मंडळांमध्ये लवकरच फोर जी सेवा सुरू करण्यात येणार आहे. हुवेईबरोबर झालेल्या सहकार्य करारामुळे व्हिडिओकॉन टेलिकॉमला हुवेईच्या ‘एलटीई रेडी पॅकेट कोअर नेटवर्क’चा वापर करता येणार आहे. यामुळे गुंतवणुकीची बचत होऊ शकेल, असे व्हिडिओकॉन टेलिकॉमचे सीईओ अरविंद बाली यांनी सांगितले.