आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारने आयात कर रद्द केला तर सोन्याचा भाव 24 हजार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोन्याच्या भावातील मंदी ही जागतिक स्तरावरील मंदीमुळे
2009 मध्ये 1 औंस सोन्याचा भाव 1,067 डॉलर होता. 2010 मध्ये 1,420 डॉलर, 2012 मध्ये 1,664 डॉलर, तर 2014 मध्ये 1,250 डॉलर हा भाव आहे. भारतात 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव 26 ते 27 हजार रुपये आहे. यापूर्वी हा भाव 29 हजार ते 30 हजार रुपये होता. निवडणुकीपूर्वीच आयातीवरील काही बंधने हटवली होती. रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत होत होता. म्हणूनच सोन्याचे भाव उतरले आहेत. 62 रुपयाला 1 डॉलर हा विनिमय दर होता. तो आज 59 रुपये आहे. सद्य:स्थितीत सोने आयातीवर 10 टक्के कर आहे. मोदी सरकारने हा आयात कर रद्द केला, तर सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 24 हजार रुपयांपर्यंत कमी होईल.

कापूस व साखरेच्या भावातील मंदीचा फटका 7 हजार कोटींचा :
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्यामुळे निर्देशांकात तेजी आहे. अंबानींच्या भांडवलामध्ये 6 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे, तर अदाणींच्या भांडवलामध्ये 2 हजार 600 कोटींची वाढ झाल्याचा अंदाज आहे. याच काळात आलेल्या कापसाच्या व साखरेच्या भावातील मंदीचा हिशेब के ला, तर शेतकर्‍यांच्या लुटीचा अंदाज येईल. कापसाच्या भावात 400 रुपये प्रती क्विंटलची मंदी म्हणजेच देशाच्या एकूण कापूस उत्पादनात 7 हजार कोटींचा फटका (3.50 कोटी कापूस गाठी), 150 ते 250 रुपये प्रती क्विंटल साखरेच्या भावातील मंदी म्हणजेच 150 ते 250 रुपये टन उसाला कमी भाव.

रुपया वाढला; पण निर्यात कमी होण्याचा धोका
या सर्वांच्या मुळात रुपयाची वाढणारी किंमत आहे. देशासाठी रुपयाच्या किमतीत वाढ फायद्याची वाढ आहे, पण, निर्यात कमी होण्याचा धोकाही आहे. आयात वाढली व निर्यात वाढली नाही, तर पुन्हा रुपयाचे अवमूल्यन होणार. शेअर बाजारातील गुंतवणूक देशाची कमाई नाही. नफा वसूल करून हे भांडवल पुन:श्च बाहेर गेले, तर रुपयाचे अवमूल्यन होणार! थोडक्यात देशात ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारला आयात कमी व निर्यात जास्त यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, एवढे मात्र निश्चित.