आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मल्ल्यांच्या ब्रँड नेम गुड टाइमचा होणार लिलाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - किंग ऑफ गुड टाइम म्हणून ओळख असणारे उद्योजक विजय मल्ल्यांच्या ब्रँड नेमचाही आता लिलाव होणार आहे. एकेकाळी देशाची मुख्य विमानसेवा असणार्‍या किंगफिशरकडे असणार्‍या थकबाकीपोटी एसबीआय कॅपिटल मार्केटने त्यांच्या सर्व ट्रेडमार्कवर निर्बंध घातले आहेत. यात या विमान वाहतूक कंपनीच्या फ्लाय किंगफिशर आणि फ्लाय गुड टाइम या टॅगलाइनचाही समावेश आहे. एसबीआय कॅपिटलच्या मालकीच्या एसबीआय कॅप ट्रस्टीने आता या सर्व ट्रेडमार्कसाठी इच्छुकांकडून बोली मागवली आहे. कधी काळी दिमाखाने आकाशात विहार करणार्‍या या विमान कंपनीवर एकूण 8000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. पुन्हा आकाश भरारी घेण्याच्या या कंपनीच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते ट्रेडमार्कच्या लिलावानंतर बँकांकडून टाळे ठोकण्यात आलेल्या गोवास्थित मल्ल्या मेन्शन आणि आणखी एक रिअल इस्टेट या मालमत्तांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्राप्तिकर प्रकरणी सुनावणी सहा जून रोजी
आर्थिक गुन्हे प्रकरणांची सुनावणी करणार्‍या विशेष न्यायालयाने सोमवारी विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध सुरूअसणारी सर्व प्रकरणांची सुनावणी सहा जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. प्राप्तिकर विभागाने हे प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. किंगफिशर एअरलाइन्समधील मूळ स्थानी कर कपात (टीडीएस) मल्ल्या यांनी सरकारी खात्यात जमा न केल्याचा आरोप यात आहे. या प्रकरणात विजय मल्ल्या प्रमुख आरोपी आहेत.
3000 कोटी रुपये मूल्यांकन होते काही वर्षांपूर्वी किंगफिशर एअरलाइन्सचे. तज्ज्ञांच्या मते, सध्या हे मूल्यांकन याहून कमी आहे.
1000 कोटी रुपये मिळू शकतात एसबीआयला मल्ल्याची गोवा मेन्शन विक्री करून. याच्या तारणापोटी 14 कर्जदात्यांची देणी आहे किंगफिशरकडे
2012 मध्येच किंगफिशरचा उड्डाण परवाना रद्द करण्यात आला होता. त्यांचा परवानाही आता मुदतबाह्य झाला आहे. दोन वर्षांत याचे नूतनीकरण होऊ शकते.