आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vineet Taneja New Micromax CEO, Divya Marathi, Samsung

मायक्रोमॅक्स मोबाइल कंपनीच्या प्रमुख पदी विनीत तनेजा यांची निवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात रोज नव-नवीन मोबाइल बाजारपेठेत विविध कंपन्यांकडून आणले जात असताना रविवारी( ता. 25) एक सुखद घटना घडली. देशातील आघाडीची मोबाइल कंपनी असलेल्या मायक्रोमॅक्सच्या प्रमुखपदी विनीत तनेजा निवड करण्‍यात आली आहे.

मायक्रोमॅक्स, ही देशातील दुस-या क्रमांकाची स्मार्टफोन उत्पादन करणारी कंपनी आहे. बाजारात होत असलेल्या उलथापालथींकडे नजर ठेवून कंपनीला सर्वोच्च स्थानी तनेजा नेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.यापूर्वी तनेजा यांनी सॅमसंग इंडियाच्या मोबाइल आणि माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचे प्रमुख म्हणून कार्य पार पाडले आहे. दूरदृष्‍टी आणि बांधिलकी मायक्रोमॅक्सच्या सहसंस्थापकांनी आणले होते त्याचा तंत्रज्ञान विस्फोटात कसा सुयोग्य वापर करता येईल यासाठी कंपनीत बदल करण्‍यात येईल, असे मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

विनीत हे भविष्‍यातील वाढीसाठी एक मैलाचा दगड ठरतील. त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभव मायक्रोमॅक्सच्या नेतृत्व भारतातील संघटनात्मक आणि व्यावसायिक वाढीच्या दृष्‍टीने महत्त्वाची ठरले, असे शर्मा यांनी सांगितले.

आपण स्मार्ट तंत्रज्ञान असलेल्या जागतिक बाजारपेठेत महागाईमुळे मागे पडलो आहोत. त्यामुळे भारतात मायक्रोमॅक्सचे नेतृत्व करून पुढील विकास पर्वात तिचे स्थाने बळकट करिल, असे तनेजा यांनी सांगितले.

विनीत तनेजा:
तनेजांनी हिंदुस्तान लिव्हर, नोकिया आणि भारती एअरटेल आणि सॅमसंग या दिग्गज ब्रँडमध्‍ये काम केले आहे. आपले अभियांत्रिकेचे पदवीशिक्षण आयआयटी रूरकी येथे तर, व्यवस्थापनाचे शिक्षण कोलकाता आयआयएम मध्‍ये पूर्ण केले आहे.