आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजारासाठी अर्थसंकल्प ठरणार कळीचा मुद्दा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील आठवड्यात निर्देशांक आणि शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. कंपन्यांची तिमाहीतील खराब कामगिरी आणि रिझर्व्ह बँकेकडून मंगळवारी व्याजदर जैसे थे ठेवण्याच्या धोरणाने आलेली निराशा हे घसरणीमागचे कारण राहिले. यात बँकांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. परिणामी प्रमुख निर्देशांक सलग तिसर्‍या दिवशी घसरून चार आठवड्यांच्या नीचांकावर बंद झाले. आरबीआयने धोरणात्मक रेपो दर ७.७५ टक्के असे स्थिर ठेवले.

या महिनाअखेर सादर होणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर व्याजदर कपातीचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिले. अशा रीतीने बाजारासाठी अर्थसंकल्र हा आता कळीचा मुद्दा राहील. या स्थितीत अर्थसंकल्पापूर्वी बाजार कन्सोलिडेट होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या पातळीत फारशी घसरण होण्याची अपेक्षा नाही. तरीही औद्योगिक उत्पादनाची डिसेंबरमधील आकडेवारी, ठोक व किरकोळ महागाईची जानेवारीची आकडेवारी यावर बाजाराची नजर राहील. ही आकडेवारी चांगली आली तर बाजारातील कल मजबूत होईल. कारण अर्थसंकल्पानंतर व्याजदर कपातीची शक्यता दुणावणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या चढ-उतारानंतर एक आठवड्यात मंगळवारी जागतिक शेअर बाजारांतील कल सकारात्मक बनले आहेत. ग्रीसवरील कर्जाबाबत करार आणि कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीत तेजी यामुळे जगातील प्रमुख शेअर बाजारात वाढ दिसून आली. नायमॅक्समध्ये तेलाची किंमत पिंपामागे ५० डॉलरच्या वर गेल्याने ऊर्जा समभागांत वाढ दिसून आली. डॉलरमध्येही तेजीच्या एका चक्रानंतर आता स्थिरता आली आहे. अशा रीतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर शेअर बाजारातील वातावरण सतर्कतेसह सकारात्मक आहेत. भारतीय बाजारात काही प्रमाणात नैराश्य दिसते आहे.

आगामी काळात शेअर बाजार मर्यादित कक्षेत राहण्याची शक्यता आहे. निफ्टी ९०३२ आणि ८५६९ अंकांच्या वर्तुळात फिरण्याची शक्यता आहे. निफ्टीला वरच्या दिशेने ८८३९ च्या आसपास पहिला अडसर होण्याची शक्यता आहे. ही पातळी पार केल्यास निप्टीत चांगली वाढ दिसून येईल. ही वाढ निफ्टीला ८९७७ अंकांच्या पुढील अडथळा पातळीपर्यंत पोहोचवू शकते. या स्तराच्या आसपास काही प्रमाणात कन्सोलिडेशन दिसून येईल. समजा निफ्टी या स्तराच्या पार गेला तर त्याला ९०३२ वर तगडा अडसर आहे.

खालच्या दिशेने निफ्टीला ८७२५ वर पहिला आधार मिळण्याची शक्यता आहे. हा एक मध्यम स्वरूपाचा आधार राहील, जो सध्याच्या बंद पातळीच्या (८७५६.५५) अगदी नजीक आहे. समजा निफ्टी या आधार पातळीच्या खाली आला किंवा बंद झाला तर त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. अशात निफ्टीला ८६८८ अंकांच्या आसपास आधार मिळेल. हा एक लघु आधार असून त्याला पुढील तगडा आधार ८५६९ वर मिळण्याची शक्यता आहे.

समभागांच्या बाबतीत या आठवड्यात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड चार्टवर उत्तम दिसताहेत. एसबीआयचा सध्याचा बंद भाव ३००.३० आहे. त्याचे पुढील डार्गेट ३०९ रुपये आणि स्टॉप लॉस २९१ रुपये आहे, तर हिंदाल्को इंडस्ट्रीजचा सध्याचा बंद भाव १४६.४५ रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य १५० रुपये आणि स्टॉप लॉस १४१ रुपये आहे.
विपुल वर्मा
लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.verma@dbcorp.in