आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vipul Varma Article About Industrial Production, Divyamarathi

महागाईचा दर आणि औद्योगिक उत्पादनावर राहणार नजरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात समभाग आणि बेंचमार्क निर्देशांकांनी मर्यादीत व्यवसाय केला. व्यावसायिक नवीन दिशा निर्देशांकांच्या अनुपस्थितीत बाजारापासून दूरच होते. त्याच वेळी परदेशी फंडांनी विक्रीचा मारा सुरू ठेवला. जानेवारी महिन्यात परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात 141 कोटी रुपयांचे नेट सेलर्स होते, तर सोमवारी शेअर बाजाराने उपलब्ध करून दिलेल्या नवीन आकडेवारीनुसार या महिन्यात आतापर्यंत परदेशी फंडांनी 1808 कोटी रुपयांचे नेट सेलिंग केले आहे. एफआयआय लाँग पोझिशन उघडण्याबरोबरच डिसेंबरच्या अखेरीपासून ताजी व शॉर्ट पोझिशनही बनवत आहेत. त्यांनी सुमारे 7 हजार कोटींची लाँग पोझिशन सुरू उघडली असून 2 हजार कोटींची शॉर्ट पोझिशन तयार केली आहे. अशा परिस्थितीत सामान्यपणे बाजाराचे संकेत मंदीचे आहेत. आगामी आठवड्यांमध्ये यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएची सत्ता येण्याच्या आशेमुळे बाजारात गेल्या काही दिवसांत तेजीचे वारे वाहत होते. पण राजकीय परिस्थितीमध्ये नवनवीन वळणे येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मोठे व्यावसायिक बाजारात लाँग पोझिशन खेळत आहेत.

जागतिक स्तरावर बाजारपेठांमध्ये तेजीच्या दिशेने काही विशेष हालचाली नाहीत. ब्रिटन आणि अमेरिकेकडून काही सकारात्मक बातम्या येत आहेत. पण याच दरम्यान चीनच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याच्याही शक्यता आहेत. त्यामुळे ब्रिटन आणि अमेरिकेकडून मिळणार्‍या चांगल्या बातम्यांच्या आनंदावर विरजण पडत आहे. म्हणून जागतिक बाजारांमध्ये सध्या ढोबळमानाने ‘वेट अँड वॉच’ असे वातावरण निर्माण होत आहे. त्यात अमेरिकेच्या बाजारपेठेत काही प्रमाणात घसरण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय बाजारपेठांमध्येही काही प्रमाणात घसरण येण्याच्या शक्यतेला बळकटी मिळत आहे.

आर्थिक बाबीचा विचार करता आगामी आठवड्यात मोठय़ा हालचाली होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात काही प्रमुख आकडेही समोर येतील. यात जानेवारीतील किरकोळ आणि ठोक महागाईच्या दराच्या आकडेवारीचा समावेश असेल. डिसेंबरच्या औद्योगिक उत्पादनाची आकडेवारीही समोर येणार आहे. ठोक आणि किरकोळ महागाई दराच्या आकड्यांवर नजर ठेवणे गरजेचे ठरणार आहे. यापैकी कशातही वाढ झाली तर ते बाजारात घसरणीसाठी कारणीभूत ठरू शकते. औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीतून फारशा अपेक्षाच नसल्यामुळे त्याचा बाजारावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या व्यापारी तोट्याच्या आकडेवारीवरून जानेवारीत व्यापारातील तोटा घटल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सोन्या-चांदीच्या आयातीत 77 टक्के घसरण आणि निर्यात वाढल्याचे मोठे योगदान आहे. त्यामुळे देशाच्या चालू आर्थिक खात्याच्या संतुलनाबाबत दृष्टिकोन काहीसा सकारात्मक झाला आहे. जानेवारीत व्यापारी तोटा 9.92 अब्ज डॉलर होता. डिसेंबरमध्ये त 10.14 अब्ज डॉलर होता.

तांत्रिकदृष्ट्या आगामी काळात बाजार ठरावीक र्मयादेनुसारच चालण्याची शक्यता आहे. निफ्टीचा 6091 वर अत्यंत महत्त्वाचा रेझिस्टन्स मिळू शकतो. जर निफ्टी यापेक्षा पुढे बंद होऊ शकला, तर बाजारात येणारा पूलबॅक त्याला 6122 पर्यंत पोहोचवू शकतो. 6120 वर निफ्टीसाठी एक महत्त्वाची सपोर्ट लेव्हल होती. त्यामुळे निफ्टी पुढे जाण्याआधी या स्तराजवळ पोहोचण्याची आशा आहे. त्यामुळे निफ्टी पुन्हा खाली येण्याची शक्यता आहे. तरीही तो पुढे सरकला तर त्याला पुढचा रेझिस्टन्स 617 वर मिळण्याची शक्यता आहे. हा एक सामान्य रेझिस्टन्स ठरेल. त्यानंतर 6228 वर मोठा रेझिस्टन्स मिळेल.
निफ्टीला खालच्या बाजूने पहिला सपोर्ट 6129 वर मिळू शकेल. हाही एक सामान्य सपोर्ट असेल. त्यानंतर 5962 वर मोठा सपोर्ट आहे. या स्तरापेक्षा खाली येण्याचा अर्थ म्हणजे निफ्टी घसरणीच्या जाळ्यात अडकला आहे. अशा परिस्थितीत तो 5791 वर खालची पातळी शोधू शकतो.

समभागांमध्ये या आठवड्यात आयसीआयसीआय बँक लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि आयडीएफसी लिमिटेड चार्टवर चांगले भासत आहेत. आयसीआयसीआय बँकेचा बंद भाव 968.85 आहे. त्याचे पुढचे टार्गेट 984 रुपये आणि स्टॉप लॉस 942 रुपये आहे. एम अँड एमचा बंद भाव 897.05 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 912 रुपये आणि स्टॉप लॉस 881 रुपये आहे. तर आयडीएफसीचा बंद भाव 98 रुपये आहे. त्याचे पुढचे टार्गेट 101 रुपये आणि स्टॉप लॉस 95 रुपये आहे.
(लेखक टेक्निकल अँनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.)
(vipul.verma@dainikbhaskargroup.com)