आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक आकडेवारी निभावणार महत्त्वाची भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील आठवड्यात शेअर बाजार अपेक्षेनुसार सकारात्मक कलासह र्मयादित कक्षेत राहिला. मागच्या वेळी नमूद केल्याप्रमाणे निफ्टीला 6091 या पातळीवर निर्णायक आधार मिळाला. जोपर्यंत निर्देशांक या पातळीवर बंद होण्यात यशस्वी होईल, तोपर्यंत बाजारातील कल सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे, गुरुवारी निर्देशांक 6091.45 वर बंद झाला. या पातळीवर तगडा आधार मिळाल्यानंतर निफ्टीने वाढीचा कल दर्शवला. मंगळवारी निफ्टीने 6216.85 या अडथळा पातळीला स्पर्श केला. मी नमूद केल्याप्रमाणे निफ्टीला 6181 वर पहिला अडथळा होईल. निर्देशांकाने काही वेळ या पातळीवर व्यवहार केला. मात्र, निर्देशांकाने निर्णायक स्वरूपात ही पातळी पार केली. आता निफ्टी 266 या पुढील अडथळा पातळीकडे झेपावताना दिसतो आहे. मात्र, या सकारात्मक वाढीला आर्थिक आणि मूलभूत पातळीवरून काहीच मदत मिळताना दिसत नाही. महसुली तूट, महागाई काही प्रमाणात नियंत्रणात आल्याने कल सकारात्मक राहिला आहे. यामुळे निवडक समभागांत खरेदी दिसून येत आहे.

जागतिक पातळीवर कल सकारात्मक आहेत. युरोपीय समुदायात विशेष करून र्जमनीकडून काही सकारात्मक वृत्तांची अपेक्षा आणि अमेरिकेतील सकारात्मक आर्थिक आकडे आल्याने भारतासह जगभरातील बाजारात वाढ दिसून आली. आगामी काळात भारतासह जगभरातील बाजारांसाठी आर्थिक आकडेवारी मोठय़ा प्रमाणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. येत्या 28 तारखेला चालू आर्थिक वर्षातील तिसर्‍या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनाची (जीडीपी) आकडेवारी जाहीर होणार आहे. त्यावर विश्लेषकांची बारकाईने नजर आहे. आर्थिक विकासाचे चक्र आधीच मंदावले आहे. यात आणखी मंदगती दिसून आल्यास बाजारात नकारात्मतक संकेत दिसून येतील. याशिवाय एचएसबीसी मार्केट मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयच्या आकडेवारीवर सर्वांचे लक्ष असेल. मागील महिन्यात याची आकडेवारी उत्तम दिसून आली. त्यामुळे फेब्रुवारीचे आकडे चांगले असण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी सकारात्मक आली, तर बाजारातील तेजीला बळ मिळणार आहे. जागतिक पातळीवर या आठवड्यात अनेक महत्त्वाचे आकडे जाहीर होणार आहेत. यात गृहनिर्माण, सीपीआय, अमेरिका आणि युरोपातील जीडीपीच्या आकडेवारीचा समावेश आहे.

तांत्रिकदृष्ट्या बाजार या आठवड्यात सकारात्मक झोनमध्ये आहे. यात वाढ दिसण्याची शक्यता आहे. त्यानंतर दबाव दिसून येण्याची शक्यता आहे. निफ्टीला वरच्या दिशेने 6266 वर पहिला अडथळा होण्याची शक्यता आहे. हा एक महत्त्वाचा अडथळा असेल. निफ्टीने हा स्तर पार केल्यास 6315 वर पुढील अडथळ्याची शक्यता आहे. हा एक हलका अडथळा आहे. त्यानंतर निफ्टीला 6356 वर जोरदार अडथळयाची शक्यता आहे.

खालच्या दिशेने निफ्टीला 6158 वर खर्‍या अर्थाने आधार मिळण्याची शक्यता आहे. हा एक महत्त्वाचा आधार आहे. समजा निफ्टी त्याखाली येऊन बंद झाल्यास बाजारात मंदीचे वातावरण दिसून येईल. समजा निफ्टी 6091 च्या खाली बंद झाला, तर बाजारावर मंदीची पकड घट्ट झाल्याचे समजावे.

या शेअर्सकडे ठेवा लक्ष :
शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि बायोकॉन लिमिटेड हे समभाग चार्टवर उत्तम दिसताहेत. एसबीआयचा मागील बंद भाव 1506 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 1538 रुपये आणि स्टॉप लॉस 1472 रुपये आहे. रिलायन्स इन्फ्राचा बंद भाव 360.90 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 368 रुपये आणि स्टॉप लॉस 352 रुपये आहे, तर बायोकॉनचा मागील बंद भाव 443.30 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 452 रुपये, तर स्टॉप लॉस 434 रुपये आहे.
विपुल वर्मा
- लेखक टेक्निकल अँनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.verma@dainikbhaskargroup.com