आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात येऊ शकते नफेखोरीची लाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेन्सेक्स आणि निफ्टी सर्वकालीन उच्च पातळी गाठणार की नाही? या चर्चांना गेल्या आठवड्यात पूर्णविराम मिळाला. दिवाळीच्या विशेष मुहूर्तावर निर्देशांक सर्वोच्च पातळीवर होते. त्याचे एक प्रमुख कारण परकीय फंड्सद्वारे झालेली खरेदी हेही आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक उपाययोजना रद्द झाल्यानंतर या फंड्सद्वारे बाजारात 3.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. आर्थिक स्थितीचा विचार करता वाईट बातम्यांची संख्या वाढतच आहे. 2013-14 या आर्थिक वर्षातील वित्तीय तुटीने उद्दिष्टापैकी 76 टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. एचएसबीसी मार्केट मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्समध्ये आॅक्टोबर महिन्यात घसरण पाहायला मिळाली. वाहन विक्री समाधानकारक राहिली. तरीही बाजारात उत्साह संचारावा, असे मात्र काहीही घडले नाही. बाँड खरेदीवर सध्याचे धोरण काही काळ कायम ठेवणार असल्याचा पुनरुच्चार फेडरल रिझर्व्हने त्यांच्या पिरियोडिक फेडरल ओपन मार्केट कमिटी मीटिंगमध्ये केला आहे. त्यामुळे भारतासारख्या बाजारपेठांमध्ये परकीय गुंतवणूक सुरू राहील. जागतिक स्तरावर आर्थिक निर्देशांकांवर संमिश्र परिणाम दिसून आले आहेत. अमेरिकेची अर्थव्यवस्था अजूनही सावरलेली नाही, तर युरोपीय अर्थव्यवस्था मात्र स्थिर आहे.

गोल्डमन सॅक्स यांनी भारताबद्दलच्या त्यांच्या मतामध्ये परिवर्तन करत ‘मार्केटवेट’केले आहे. निफ्टीसाठी त्यांनी 6,900 अंकांचे लक्ष्य ठेवले आहे. हे आश्चर्यकारक आहे, कारण बहुतांश परकीय फंड्स भारताबद्दल निराशावादी असतात. यादरम्यान जमा खात्यांबर दबाव कमी झाला असल्याचे गोल्डमन सॅक्स यांनी म्हटले आहे. तसेच अर्थव्यवस्थेतही चक्रीय सुधारणा दिसून येत आहेत.

मला वाटते, बाजारात आगामी काळात करेक्शन आणि चांगली परिस्थिती येऊ शकते. त्याचे कारण म्हणजे सध्या तरी बाजारात तेजीची परिस्थिती येण्याचा अंदाज नाही. गेल्या 18 सत्रांमध्ये परकीय गुंतवणूकदारांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे या आठवड्यात नफेखोरीची लाट येण्याची दाट शक्यता असल्याने सावध राहावे लागणार आहे. मध्यम कालावधीत ट्रेड सकारात्मक राहू शकतात. कारण वीकली चार्टमध्ये रिव्हर्सलचा टेक्निकल इंडिकेटर दिसून येत नाही.

सपोर्ट आणि रेझिस्टंसचा विचार करता एसअँडपी सीएनएक्स निफ्टीला खाली 6,244 अंकांवर महत्त्वाचा सपोर्ट मिळू शकतो. कारण त्यानंतर 58 अंक खाली म्हणजे 6,195 वर पुढचा सपोर्ट आहे.

हा मजबूत सपोर्ट आहे. त्यानंतर 6,034 अंकांवर चांगला सपोर्ट आहे. वरच्या पातळीवर पहिला सपोर्ट 6,301 अंकांवर मिळेल. त्यानंतर 6,398 अंकांवर दुसरा चांगला सपोर्ट मिळू शकतो. त्यामुळे बाजारात नफेखोरीची आणि चांगली स्थिती निर्माण होऊ शकते.

स्टॉक्समध्ये या आठवड्यात टायटन इंडस्ट्रीज लिमिटेड टीव्हीएस मोटार्स लिमिटेड आणि कोटक महिंद्रा बँक लिमिटेड चार्ट्‍सवर मजबूत राहू शकतात. टायटनचा अंतिम दर 258.65 रुपये आहे.

टारगेट 265 रुपये आणि स्टॉप लॉस 250 रुपये आहे. टीव्हीएस मोटार्सचा अंतिम दर 50.15 रुपये आहे. टारगेट 52.50 रुपये आणि स्टॉप लॉस 48 रुपये आहे, तर कोटक महिंद्राचा अंतिम दर 745.40 रुपये आहे. टारगेट 759 आणि स्टॉप लॉस 731 रुपये आहे.

- लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.
(vipul.verma@dainikbhaskargroup.com)