आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरणीनंतर निफ्टीला खालच्या पातळीचा शोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपेक्षेनुसार गेल्या आठवड्यात विविध कंपन्यांचे शेअर आणि बेंचमार्क निर्देशांक घसरण होऊन खालचा पातळीवर बंद झाला. नवीन दिशादर्शकांच्या अभावात परकीय बाजारपेठांमध्ये सतर्कतेचे वातावरण होते. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर निफ्टीने विक्रमी पातळी गाठली. त्यानंतर लगेचच बाजारात घसरणीचे संकेत दिसू लागले होते. व्हॉल्यूम घसरला आणि त्याचबरोबर परकीय फंडांच्या खरेदीबाबत अनुत्सुकता दिसू लागल्याने शेअर बाजाराचा घसरणीचा मार्ग मोकळा झाला होता. तसेच काही वेळापासून टेक्निकल करेक्शनही गरजेचे झाले होते. मंगळवारी शेअर बाजारात घसरणीचे मुख्य कारण रुपयाची वेगाने झालेली पडझड हे होते. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने 63.84 ची नीचांकी पातळी गाठली. त्यावर दुपारनंतर विक्रीच्या मा-यामुळे दबाव अधिकच वाढला. तरीही अद्याप आलेल्या तिमाहीच्या निकालांवर त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. तरीही स्थानिक शेअर बाजारात शेअर्सच्या किमतींमधील अस्थिरतेमुळे घसरण पाहायला मिळाली. व्यापारामध्ये तोटा कमी होणे हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत आहेत; पण ठोक आणि किरकोळ महागाई दराचे आकडे वाढण्याच्या शक्यतेने बाजारावर अंकुश निर्माण केला आहे.
स्टँडर्ड अँड पुअर्स (एस अँड पी)ने भारताच्या रेटिंगबाबत मांडलेले मतही बाजारासाठी पोषक ठरले नाही. यातही याच बाबीला अधोरेखित करण्यात आले की, स्थानिक बाजाराला बाहेरच्या कारणांमुळेच अधिक धोका आहे. अमेरिकेत बिगर कृषी क्षेत्रातील नोक-यांची आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली आहे. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था आधीच्या तुलनेत चांगल्या स्थितीत असून सुधारणा होत असल्याचे सत्यावरून स्पष्ट होते. हा सगळा चांगल्या बातम्यांचा एक भाग होता; पण भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारावर मात्र त्याचा सकारात्मक परिणाम जाणवला नाही. त्यमुळे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह त्यांची बाँड खरेदी योजनेत शक्यतेपेक्षा आधी कपात करण्याच्या शक्यतांना बळकटी मिळाली. त्यामुळे बाजारात लवकरच पुलबॅक पाहायला मिळेल या भीतीने बाजारातील सर्व शक्यता कमकुवत झाल्याची जाणीव निर्माण झाली. स्थानिक बाजारपेठेचा विचार करता सध्या बाजाराला खालच्या पातळीचा शोध आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये काही प्रमाणात पुलबॅक पाहायला मिळू शकतो. घसरणा-या निफ्टीला पहिला सपोर्ट 5980 वर मिळू शकतो. या पातळीवर निफ्टीमध्ये काही प्रमाणात कन्सोलिडेशननंतर पुलबॅक पाहायला मिळू शकतो. जर निफ्टीने यापेक्षा अधिक खालची पातळी गाठली तर तो मंदीच्या काचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास 5877 पर्यंत ही पातळी खाली येऊ शकते. हा निफ्टीसाठी तगडा सपोर्ट ठरू शकतो.
वरच्या पातळीवर निफ्टीला सध्या 6035 वर रेझिस्टन्स आहे. हा एक हलका रेझिस्टन्स ठरू शकतो. जर चांगल्या व्हॉल्यूमचा जोर राहिला तर निफ्टी त्याला पार करू शकतो. त्याला पुढचा रेझिस्टन्स 6124 वर मिळेल. हा एक चांगला रेझिस्टन्स ठरू शकतो. या पातळीवर काही प्रमाणात कन्सोलिडेशन पाहायला मिळू शकते; पण तेजीची लाट आल्यास निफ्टीचा वाढता जोर थांबवता येणार नाही. त्याला पुढचा रेझिस्टन्स 6220 वर मिळेल. हा मजबूत आणि पुढचा रेझिस्टन्स असेल व त्यामुळे नफेखोरीची लाट पाहायला मिळू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारावर लक्ष केंद्रित करायला हवे. शेअर्समध्ये या आठवड्यात टीसीएस, एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड आणि टायटन इंडस्ट्रीज लिमिटेड चांगले राहण्याची शक्यता आहे. टीसीएसचा दर 2087.15 रुपये आहे. त्याचे पुढचे टार्गेट 2124 रुपये आणि स्टॉप लॉस 2051 रुपये आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडचा दर 210.95 रुपये आहे. त्याचे पुढचे टार्गेट 217 रुपये आणि स्टॉप लॉस 202 रुपये आहे. तर, टायटन इंडस्ट्रीजचा बंद भाव 231.80 रुपये आहे. त्याचे टार्गेट 238 रुपये आणि स्टॉप लॉस 222 रुपये आहे.
- लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.