आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vipul Varma's Article On Share Market , Investors Must Use Discretion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सतर्कतेसह विशेष समभाग खरेदीचे धोरण हवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेअर बाजाराचे निर्देशांक आता सर्व महत्त्वाचे उच्चांक ओलांडून नव्या शिखरावर पोहोचले आहेत. निफ्टीने ८००० अंकाचा, तर सेन्सेक्सने २७ हजारांचा टप्पा पार केला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपी विकासदर अपेक्षेपेक्षा चांगला राहिल्याने उत्साहित होऊन विदेशी फंडांनी जोरदार खरेदीचे धोरण ठेवले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने एप्रलि ते जून या तिमाहीत ५.७ टक्के दराने वाढ नोंदवली आहे. वर्षापूर्वी याच काळात विकासदर ४.७ टक्के होता. यामुळे आशियातील ही तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आता रुळावर येत असून ती मजबूत होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. विकासाची गती वाढण्यात सेवा, वीज उत्पादन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. जानेवारी ते मार्च २०१२ या काळात विकासाचा दर ८.५ टक्के होती. त्यानंतरची सर्वात गतीने झालेली ही वाढ आहे. विदेशी फंडांच्या खरेदीचा उत्साह वाढवण्यासाठी हे कारण पुरेसे ठरले. मात्र, ही वाढ आगामी तिमाहीत कायम राहण्याबाबत शंका आहे. एचएसबीसी मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय ५३ वरून घटून ५२.४ अंकांवर येण्याने या शंकेला पुष्टी मिळाली आहे. असे असले तरी आगामी काळात अर्थव्यवस्थेची वाढती गती कायम राहण्याची आशा वाढली आहे. त्यामुळेच बाजाराने पीएमआयच्या आकडेवारीकडे दुर्लक्ष केले. अलीकडेच झालेल्या काही सुधारणांमुळे जीडीपीच्या अंदाजात वाढ केल्यानेही बाजारातील वाढ दिसून आली.
मात्र, सर्व आघाड्यांवर सर्व काही आलबेल सुरू आहे असे नाही. मागील आठवड्यात जाहीर झालेल्या महसूलविषयक आकडेवारीने हे भयानक िचत्र सर्वांसमोर आले. एप्रलि ते जून या काळात महसुली तूट ३.२५ लाख कोटींवर(सुमारे ५३.७ अब्ज रुपये) पोहोचली. पूर्ण वर्षासाठीच्या लक्ष्याच्या तुलनेत हे प्रमाण ६१.२ टक्के आहे. खर्चात कपातीला अत्यंत कमी वाव आहे. महसुली तुटीचे ४.१ टक्के हे लक्ष्य साधणे हे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासाठी एक मोठे आव्हान आहे. आता अर्थव्यवस्थेबाबत अंदाज घेण्यासाठी सर्वांच्या नजरा ठोक आणि िकरकोळ महागाई दरांच्या आकडेवारीकडे आहेत. या महनि्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे आकडे जाहीर होणार आहेत.
जागतिक पातळीवरून फारशा उत्साहवर्धक बातम्या नाहीत. युक्रेनमध्ये तणाव आणि इराकमधील युद्धसदृश परिस्थतिी कायम आहे. शिवाय युरोझाेनमध्ये तणाव येण्याचे ताजे संकेत आहेत. यामुळे तेथील फ्रान्स व जर्मनी या प्रमुख देशांवरचा दबाब वाढला आहे. या परिस्थतिीवर वेळीच नियंत्रण मिळ‌वले नाही, तर युरोझाेनमधील अर्थव्यवस्था आणखी एका संकटाच्या तोंडावर उभी राहील. अमेरिकेतून चांगले संकेत मिळणे सुरूच आहे. आता सर्वांच्या नजरा तेथील अकृषी क्षेत्रातील रोजगारविषयक आकडेवारीकडे आहेत. ही आकडेवारी शुक्रवारी जाहीर होणार आहे. जॉब मार्केटची आकडेवारी चांगली आली, तर फेडरल रिझर्व्हसाठी ते संकेत ठरतील. फेडरल रिझर्व्ह अपेक्षेपेक्षा आधीच व्याजदरात वाढ करण्याच्या सर्वांचा अंदाज आहे. असे झाले तर विकसनशील देशांसाठी ही मोठी अडचण ठरणार आहे. सध्या विदेशी फंडांच्या खरेदीच्या जोरावर या देशातील शेअर बाजार तेजीवर स्वार आहेत.
तांति्रकदृष्ट्या देशातील शेअर बाजार आता विक्रमी उंचीवर पोहोचले असून मजबूत िस्थती दर्शवत आहेत. मंगळवारी निफ्टीने ८१०० चे शिखर सर केले. असे असले तरी बाजाराने आपली उंची गाठली असल्याचे म्हणणे सध्या तरी धाडसाचे ठरेल. तरीही गुंतवणूकदारांना बाजारात सतर्कतेसह सकारात्मक धोरण अवलंबवावे लागेल. विशेष समभागांची खरेदी करणे योग्य राहील.
निफ्टीला वरच्या दिशेने ८१२८ वर चांगला अडथळा आहे. त्यानंतर ८१६७ वर निफ्टीला मजबूत अडसर आहे. निफ्टीला खालच्या दिशेने ८०३४ वर पहिला चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे. हा एक मध्यम स्वरूपाचा आधार आहे. निफ्टीला आता ७९६७ वर अत्यंत महत्त्वाचा व चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे. या पातळीच्या आसपास निफ्टी आपला खालचा स्तर शोधण्याची दाट शक्यता आहे. निफ्टी या पातळीच्या खाली आला, तर ते बाजारातील घसरणीचे संकेत मानावेत.
या शेअर्सकडे ठेवा लक्ष : शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात एचडीएफसी लिमिटेड, आंध्रा बँक लिमिटेड आणि टाटा स्टील लिमिटेड चार्टवर उत्तम दिसताहेत. एचडीएफसीचा बंद भाव १०६७.३० रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य १०८९ रुपये आणि स्टॉप लॉस १०४३ रुपये आहे. आंध्रा बँकेचा बंद भाव ७५.५५ रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य ७९ रुपये आणि स्टॉप लॉस ७१ रुपये आहे. टाटा स्टीलचा बंद भाव ५१९.२० रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य ५२८ रुपये आणि स्टॉप लॉस ५०९ रुपये आहे.

- लेखक टेक्निकल अॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीइओ आहेत.
vipul.varma@dainikbhaskargroup.com