आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेटपूर्वी निफ्टीत तेजीची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुलनेने खालच्या स्तरावर खरेदी झाल्याने शेअर बाजाराचे सूचकांक अपेक्षेनुसार कन्सॉलिडेट झाले आहेत. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कोणतीच सकारात्मक बातमी नाही, तरीही बाजाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनवर मोठा विश्वास दर्शवला आहे. त्यामुळेच बजेटपूर्वी सोमवारी बाजारात तेजी दिसून आली. सध्या तरी भारतीय अर्थव्यवस्था अनेक आघाड्यांवर संघर्ष करते आहे. महागाईचा आगडोंब उसळला असतानाच सर्वत्र दुष्काळसदृश स्थितीची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील अनेक भागांत अद्याप मान्सून पोहोचलेला नाही, तर इराकमधील स्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची टांगती तलवार आहे. यामुळेही चिंतेत भर पडली आहे. कच्चे तेल मागील आठवड्याच्या तुलनेत काही प्रमाणात नरमले असले तरी अजून त्याच्या किमती जास्तच आहेत.

इराकमधील संकट कायम राहिले तर कच्चे तेल आणखी भडकण्याची शक्यता आहे. आर्थिक आकडेवारीही फारशी समाधानकारक नाही. एप्रिल-मेमध्येच महसुली तूट गतीने वाढून एकूण वर्षाच्या 45.6 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्ष 2014-15 मधील पहिल्या दोन महिन्यांतच योजनेतर खर्च जास्त झाल्याने तो वाढून 2.40 लाख कोटी रुपयांच्या पार झाला आहे. एक वर्षापूर्वी याच कालावधीत हा खर्च 1.81 लाख कोटी रुपये होता. तर देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) 38 वाटा असणार्‍या आठ महत्त्वाच्या पायाभूत उद्योग क्षेत्राची वाढ 2.3 टक्के राहिली. एप्रिलमध्ये ही वाढ 4.2 टक्के गतीने झाली होती. एक वर्षापूर्वी समान कालावधीत ही वाढ 4.9 टक्क्यांहून कमी होती. असे असले तरी मोदी मॅजिकमुळे बाजार तेजीत आहे. त्याचा परिणाम 10 जुलै रोजी अर्थसंकल्पात दिसून येईल. जागतिक स्तरावर कल सकारात्मक आहेत. अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि जर्मनी-ब्रिटनसह युरोपातून चांगले आर्थिक संकेत मिळताहेत. चीनकडून मिळणारे आर्थिक संकेत बर्‍याच काळापासून स्थिर आहेत.

देशातील बाजार सकारात्मक कलांसह कन्सॉलिडेट होण्याची शक्यता आहे. बजेट मार्केट फ्रेंडली राहण्याची शक्यता आहे. बँकांच्या समभागांच्या जोरावर निफ्टी आणखी वाढ नोंदवण्याची शक्यता आहे. अशात निफ्टीला वरच्या दिशेने 7672 वर पहिला अडथळा होण्याची शक्यता आहे. या पातळीच्या आसपास काही प्रमाणात कन्सॉलिडेशन दिसून येईल. त्यानंतर काही प्रमाणात तेजी येईल. अशात निफ्टी नवा उच्चांक साधण्यासाठी प्रयत्नशील राहील. निफ्टीसाठी 7749-7781 ही मर्यादा पार करणे अवघड राहील. वाढत्या निफ्टीसाठी हा मोठा अडसर राहील.

खालच्या दिशेने निफ्टीला 7587 अंकांवर आधार आहे. हा मध्यम स्वरूपाचा आधार आहे. ही पातळी तुटल्यास कल बदलण्याची शक्यता आहे. अशात निफ्टीला 7530 वर अर्थपूर्ण आधार मिळण्याची शक्यता आहे. हाही मध्यम स्वरूपाचा आधार आहे. व्हॉल्यूमसह विक्रीवर दबाब येण्याची शक्यता असल्याने निफ्टी येथे टिकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. घसरणार्‍या निप्टीला 7476 च्या आसपास चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे. क्लोजिंग आधारावर निफ्टी याखाली आला तर बाजारात मोठ्या घसरणीचे संकेत मानावेत.

या समभागांकडे ठेवा लक्ष
शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात एचडीएफसी लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड आणि हॅवेल्स इंडिया लिमिटेड चार्टवर उत्तम दिसताहेत. एचडीएफसीचा मागील बंद भाव 984.10 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 1006 रुपये आणि स्टॉप लॉस 965 रुपये आहे. कोटक महिंद्रा बँकेचा मागील बंद भाव 884.35 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 900 रुपये आणि स्टॉप लॉस 867 रुपये आहे. हॅवेल्स इंडियाचा मागील बंद भाव 1171.55 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 1193 रुपये आणि स्टॉप लॉस 1149 रुपये आहे.

लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.
(फोटो - विपुल वर्मा)