आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिक्का इन्फोसिसला चमकवणार? नारायणमूर्तींंचा पायउतार,विशाल सिक्का नवे एमडी-सीईओ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सॅपचे माजी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी विशाल सिक्का इन्फोसिसचे नवे सीईओ आणि एमडी असतील अशी घोषणा गुरुवारी इन्फोसिसने केली. येत्या एक ऑगस्टपासून सिक्का एस.डी. शिबुलाल यांची जागा घेतील, देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या या सॉफ्टवेअर कंपनीच्या सीईओपदी प्रथमच संस्थापक नसणारी व्यक्ती सिक्का यांच्या रूपात काम पाहणार आहे. शनिवारी (14 जून) इन्फोसिसची वार्षिक सभा होणार आहे. त्या वेळी कार्यकारी अध्यक्ष एन. आर. नारायणमूर्ती आणि कार्यकारी उपाध्यक्ष एस. गोपाळकृष्णन पदावरून पायउतार होणार आहेत. उद्योग जगतातील बहुतेकांनी या बदलाचे स्वागत केले.

सॅप ते इन्फोसिस...
स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्सची पीएच.डी. पदवी मिळवलेले 47 वर्षीय विशाल सिक्का सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज मानले जातात. नव्या उत्पादनाची मांडणी, विकास आणि सादरीकरण यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी सॅपचे चीफ टेक्निकल ऑफिसर म्हणून सिक्का यांनी काम पाहिले आहे. या क्षेत्रातील त्यांचा दांडगा अनुभव लक्षात घेऊनच इन्फोसिसने त्यांची सीईओ व एमडी म्हणून निवड केली आहे.
ही तर चांगली संधी...
इन्फोसिसचे नेतृत्व लाभणे हा मी माझा सन्मान मानतो. संगणकीय तंत्रज्ञान आता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात अविभाज्य बनले आहे. इन्फोसिसच्या माध्यमातून कंपनीचे कर्मचारी, ग्राहक, गुंतवणूकदार, समभागधारक यांचे समाधान करण्याची संधी ही चांगली संधी आहे.
-विशाल सिक्का

सिक्का यांच्यावरील जबाबदारी
० सीईओ तसेच व्यवस्थापकीय संचालकपद
० पारंपरिक तसेच क्लाउड आधारित सर्व उत्पादनांची जबाबदारी
० एचएएनए प्लॅटफॉर्म, अ‍ॅनालिटिक्स, मोबाइल व मिडलवेअर उत्पादने

इन्फोसिसमधील इतर बदल
० शनिवारी 14 जून रोजी होणार्‍या वार्षिक सभेच्या वेळी अनेक बदल होणार आहेत. ते असे :
० श्रीनाथ बाटणी - पूर्णवेळ संचालक- जुलै 11 पासून कार्यमुक्त होणार
० यू.बी. प्रवीण राव सध्या पूर्णवेळ संचालक आहेत. 14 जूनपासून चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून काम पाहणार
० कार्यकारी अध्यक्ष एन. आर. नारायणमूर्ती आणि कार्यकारी उपाध्यक्ष एस. गोपाळकृष्णन पदावरून पायउतार होणार

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सिक्का यांच्यापुढील आव्हाने