आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Visits ToTourism Site, Latest News In Divya Marathi

पर्यटनस्थळांना भेटी द्या आता थेट सी-प्लेनने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुढच्या वेळेला तुम्हाला लोणावळा, शिर्डी, मुरूड जंजिरा किंवा अन्य कोठेही जायचे असेल, तर बस किंवा खासगी वाहनापेक्षाही जलद म्हणजे अगदी काही तासांत पोहोचता येऊ शकणार आहे. कारण राज्यातल्या पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी आता थेट सी-प्लेनचा सुखद पर्याय सोमवार, 24 फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. नागरी हवाई वाहतूक, पर्यटन आणि सुरक्षा अशा सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर मेरिटाइम एनर्जी हेली एअर सर्व्हिसेस प्रा.लि. अर्थात मेहेर ही कंपनी राज्यातील पहिली सी-प्लेन वाहतूक सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारत असलेल्या या सी-प्लेन सेवेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सोमवारी करण्यात येणार आहेत. आतापर्यंत अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांना ही सेवा दिल्यानंतर आता मुंबईसह महाराष्ट्रातही सुरू करण्यात येत आहे. अलीकडेच झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील यांनी शिर्डीला जाणारे भाविक आणि कोयना धरण (पुणे) महाबळेश्वरला जाणारे पर्यटक लक्षात घेता अहमदनगरमधील राहुरी जिल्हा या सेवेने जोडण्यात येणार असल्याचे सांगितले होते.लोणावळा, मुरूड जंजिरा, भंडारदरा आणि शिर्डी ही पाच पर्यटन स्थळे पहिल्या टप्प्यात सी-प्लेन सेवेने जोडण्यात येणार आहेत. त्याशिवाय जुहू ते नरिमन पॉइंट अशी प्रवासी सी-प्लेन वाहतूकही सुरू करण्याची योजना आहे.