आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्होडाफोनने आणला नवा रोमिंग प्लॅन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - व्होडाफोन इंडियाने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवा रोमिंग प्लॅन सादर केला आहे. देशभरासाठी लागू असलेल्या या प्लॅननुसार इनकमिंग कॉलसाठी 30 पैसे प्रतिमिनिट तर आउटगोइंगसाठी 90 पैसे प्रतिमिनिट दर राहील, असे कंपनीने म्हटले आहे. रोमिंगमध्ये असताना व्होडाफोन प्रीपेड ग्राहकांना आता कमी पैसे लागणार आहेत. नवा प्लॅन कार्यान्वित करण्यासाठी ग्राहकांना 26 ते 47 रुपयांचे रिचार्ज रोमिंग पॅक मारावे लागणार आहे.

रोमिंगचे दर राज्यनिहाय आणि रेंजनिहाय वेगवेगळे असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. सध्या सर्वसाधारण रोमिंगचे दर इनकमिंगसाठी 1 रुपया तर आउटगोइंगसाठी 1.50 रुपये प्रतिमिनिट असे आहेत. अशा स्वरूपाची योजना सादर केल्याने आम्ही ग्राहकांच्या अधिक जवळ जाऊ, असे व्होडाफोनचे सीसीओ विवेक माथूर यांनी सांगितले.