आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वोडाफोनची 2जी, 3जी इंटरनेट सेवा महागली; युजर्सला मोजावी लागेल दुप्पट रक्कम!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- मोबाइल सर्व्हिस प्रोव्हाइडर कंपनी 'वोडाफोन इंडिया'ने आपल्या 2जी व 3जी ग्राहकांना जबरदस्त झटका दिला आहे. वोडाफोनने मोबाइल इंटरनेट सेवेच्या दरात दुप्पट वाढ करण्‍याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ योजनाबद्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांन‍ी सांगितले आहे.

'पे एज यू गो' (पीएवायजी) या पद्धतीनुसार प्रीपेड आणि पोस्टपेड यूजर्सेसाठी आता नवा दर 4 पैसे प्रति 10 केबी राहील. याआधी 10 केबीसाठी 2 पैसे आकारले जात होते. यापूर्वी कंपनीने नोव्हेंबर 2013 मध्ये दरांमध्ये 80 टक्के कपात केली होती. नेट सर्फिंग प्रति 10 केबीसाठी 2 पैसे आकारले जात होते. वोडाफोनने पीएवायजीच्या ग्राहकांसाठी मोबाइल इंटरेनट शुल्कात संशोधन करण्यात आले असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. नवे दर सर्व सर्कलमध्ये टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. सगळ्यात आकर्षक आणि कमी दरात प्रीपेड आणि पोस्‍टेड यूजर्सला मोबाइल इंटरनेट सेवा देण्याचा दावाही कंपनीने केला आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये कंपनीच्या डेटा ट्रॅफिकमध्ये जवळपास 125 टक्के वाढ झाल्याचे सूत्रांन‍ी सांगितले.
( फाईल फोटो)