फोक्सवॅगनच्या ‘पोलो’चे आगमन / फोक्सवॅगनच्या ‘पोलो’चे आगमन

Apr 30,2013 08:15:00 AM IST

मुंबई- मोटारनिर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या युरोपमधील फोक्सवॅगन या कंपनीने आपली ‘पोलो’ ही लोकप्रिय ठरलेली हॅचबॅक भारतीय वाहन बाजारात दाखल केली आहे. पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही पर्याय उपलब्ध असलेल्या या नव्या पोलो जीटी टीएसआय मोटारीमध्ये 1.2 लिटर इंधन क्षमता असलेले इंजिन बसवण्यात आले असून त्यासाठी खास ‘टीएसआय’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

फोक्सवॅगनच्या या नव्या मोटारीतील पेट्रोल इंजिनासाठी ‘टीएसआय’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. हे इंजिन आकाराने लहान, पण उच्च शक्तीचे आणि इंधनाचा कमीत कमी वापर करणारे आहे. ड्रायविं्हगमधील आनंद मिळवतानाच इंधनाचा कार्यक्षम वापर या दोन्ही दृष्टीने हे इंजिन लाभदायक आहे. टबरे चार्जरच्या उपयोगाबरोबरच उच्च दाबावरील हवा व थेट पेट्रोल इंजेक्शन यांचा मेळ घालून हे साध्य केले जाते, ज्यामुळे उच्च इंधन कार्यक्षमता प्राप्त करणे शक्य होते.

फीचर्स
> ब्लॅक फिनिशयुक्त हॅलोजन हेडलॅम्प्स
> चामड्यात मढवलेले स्टिअरिंग व्हील, गिअरशिफ्ट नॉब आणि हँडब्रेक लिव्हर हँडल, दारांवर पकडण्याकरिता 3 हँडल्स, कोट हुक्ससह येणारे फोलिं्डग
> सामान ठेवण्याच्या भागावर आवरण/पार्सल ट्रे.
> धूळ आणि परागकणांना बाहेरच ठेवणारी ‘क्लायमेट्रॉनिक’ स्वयंचलित वातानुकूलन यंत्रणा.
> यूसीबी, ऑक्स-इन, एसडी कार्ड, ब्लूटूथ, चार स्पीकर्ससह टूडीआयएन आरसीडी 320 म्युझिक सिस्टिम.
> उंचीत बदल करता येण्याजोगी ड्रायव्हर्स सीट.

X