आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिरवळ - अत्याधुनिक पद्धतीने मध्यम व्होल्टेज स्वीचगिअरची निर्मिती करणाºया प्रकल्पाचे उद्घाटन स्नाइडर इलेक्ट्रिक कंपनीचे कार्यकारी संचालक ऑलिव्हर ब्लम यांच्या हस्ते झाले. स्नाइडरचे भागीदार प्रिस्टिन स्विचगिअर्स यांनी हा प्रकल्प उभारला आहे.
शिरवळ (जि. सातारा) येथील प्रकल्पामुळे व्यवस्थापनातील अधिकाºयांसह 300 जणांना रोजगार मिळणार आहे. स्थानिक लोकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात आले असल्याचे प्रिस्टिनचे चेअरमन अशोक कोरडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, 4000 चौरस मीटर क्षेत्रातील हा प्रकल्प 12 महिन्यांत पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पाला आयएसओ 9001-2008 हे पमाणपत्र मिळाले आहे.
या प्रकल्पात 36 किलोवॅटपर्यंत अलायन्स पार्टनर, 24 किलोवॅटपर्यंतचे लायसेन्सी पॅनेल, एसएमई टाइप स्विच फ्यूज पॅनल्स आणि व्हॅल्यू अॅडेड रिंग मेन युनिट सिस्टिम आदींचे उत्पादन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची क्षमता 2500 पॅनेल निर्मितीची आहे. उद्घाटनप्रसंगी स्नाइडर इलेक्ट्रिक कंपनीतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.