- Marathi News
- Wait Till Budget For Purchasing Gold, Prices May Fall Further
ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोने : आयात शुल्क घटणार; जाणून घ्या, कशी ठरते किंमत

नवी दिल्ली - येत्या 10 जुलै रोजी संसदेत सादर होणार्या केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क घटण्याची शक्यता आहे. असे झाले तर सोन्याच्या किमती घसरणे अटळ आहे. त्यामुळे सोने खरेदी करणार असाल तर अर्थसंकल्पापर्यंत वाट पाहणे फायद्याचे राहील. आगामी काळात सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्याचे संकेत वाणिज्य सचिवांनी दिले आहेत. सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्याची मागणी सराफ व्यापारी, दागिने तयार करणारे ज्वेलर्स यांच्याकडून सातत्याने होत आहे.
चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी पुरोगामी लोकशाही आघाडी (यूपीए) सरकारने सोन्यावरील आयात शुल्क दोन टक्क्यांवरून 10 टक्के केले होते. मात्र, सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात घटल्याने चालू खात्यातील तूट 31 मार्चअखेर घटून 32.4 अब्ज डॉलरवर आली आहे. गेल्या वर्षी ही तूट 8738 अब्ज डॉलर होती.
दुसरीकडे आयात शुल्क वाढल्याने सोन्याचा पुरवठा कमी झाला. परिणामी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. त्याचप्रमाणे ज्वेलर्सचा नफा घटला. देशातील बहुतेक ज्वेलर्सच्या मते सोन्यावरील आयात शुल्कात 2 ते 4 टक्के कपातीची अपेक्षा आहे. अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात 4 टक्के कपात होण्याचे संकेत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, अशी ठरते सोन्याची किंमत