आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Waits For Petrol Car In The Festive Season, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल कारसाठी आता वेटिंग करावी लागणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सणासुदीत पेट्रोल कार खरेदी करणार असाल, तर कार ताब्यात येण्यास प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या कार नुकत्याच बाजारात आल्या आहेत, त्यांच्यासाठी जास्त वेटिंग करावी लागणार आहे. डिझेल व पेट्रोलच्या किमतीतील घटत्या फरकामुळे पेट्रोल कारच्या मागणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

होंडा सिटी पेट्रोलसाठी ३ महिन्यांचे वेटिंग : फोर्डच्या इको स्पोर्टस पेट्रोल कारसाठी १ महिना प्रतीक्षा कालावधी आहे, तर याच्या ऑटोमॅटिक मॉडेलसाठी २ ते ३ महिने प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी डिझेल मॉडेल मात्र तत्काळ उपलब्ध आहे. याशिवाय होंडाच्या नव्या सिटीसाठी ३ महिने, मोबिलियासाठी २ ते ३ महिने, अमेझसाठी एक महिना प्रतीक्षा कालावधी आहे. नुकत्याच लाँच झालेल्या आय-२० एलिटसाठी २ ते ३ महिन्यांचे वेटिंग आहे. ह्युंदाईची डिझेल आय-१० ग्रँड तत्काळ मिळेल. मात्र, पेट्रोल मॉडेलसाठी मात्र महिनाभर वेटिंग आहे.