आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WalMart India Unit Head Jain Leaves After Six Years

वॉलमार्टचे भारतातील प्रमुख राज जैन यांचा राजीनामा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अमेरिकेतील आघाडीची रिटेल कंपनी 'वॉलमार्ट'चे भारतातील प्रमुख राज जैन यांनी राजीनामा दिला आहे. आपल्‍या पदाचा कार्यभार त्‍यांनी रामनिक नार्से यांच्‍याकडे सोपविला आहे.

कंपनीने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, गेल्‍या सहा वर्षांपासून भारतातील प्रमुख म्‍हणून काम पाहणारे जैन यांचे कंपनीसोबतचे संबंध संपुष्‍टात आले आहेत.

जैन यांनी 2006 मध्‍ये जबाबदारी स्विकारली होती. जैन यांच्‍या राजीनाम्‍यामुळे चर्चेला उधाण आले आहे. भारतात थेट परकीय गुंतवणूकीला मंजूरी मिळावी आणि कंपनीला व्‍यवसाय करता यावा यासाठी कंपनीने मोठे लॉबिंग केले होते. त्‍यासाठी कंपनीने कोट्यवधी रुपये खर्च केले होते. यासंदर्भात भारतात चौकशी सुरु आहे. याशिवाय भारती एंटरप्रायझेस आणि सेडार सपोर्ट सर्व्हिसेस या कंपन्‍यांमध्‍ये केलेल्‍या गुंतवणूकीसंदर्भातही चौकशी करण्‍यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर जैन यांचा राजीनामा चर्चेत आला आहे. परंतु, राज जैन यांनी राजीनामा का दिला याबाबत कंपनीतर्फे कोणतेही स्पष्टीकरण दिले गेलेले नाही. रामनिक नार्से हे कंपनीत वरीष्‍ठ उपाध्‍यक्ष म्‍हणून काम पाहत होते. आता त्‍यांच्‍याकडे प्रभारी प्रमुख म्‍हणून जबाबदारी सोपविण्‍यात आली आहे.