आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेल्डिंग क्षेत्रात 2100 कोटींची गुंतवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येत्या तीन वर्षांत देशातील अग्रगण्य कंपन्यांकडून वेल्डिंग उपकरणांमध्ये 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याचा अंदाज वेल्डिंग उद्योगाने व्यक्त केला आहे.

भारतीय संरक्षण विभाग, रेल्वे, जहाज बांधणी, विद्युत निर्मिती, ऑटोमोबाइल्स, पायाभूत आदी विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांकडून ही गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक वेल्डिंग उपकरणांमुळे विजेच्या बचतीबरोबरच वेल्डिंंगच्या कामातही 50 टक्क्यांनी बचत होणार आहे. कमीत कमी ऊर्जा वापरण्याचा कल जास्त राहणार असल्याने वेल्डिंगच्या खर्चात साधारण 20 ते 30 टक्क्यांनी बचत होऊन 40 महिन्यांपेक्षा कमी वेळात गुंतवणूक परतावा मिळण्यास मदत होऊ शकेल, असे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग या संस्थेचे अध्यक्ष पी. के. दास यांनी सांगितले.

तांत्रिक कौशल्यात सुधारणा, नवीन प्रक्रियांचा जास्तीत जास्त वापर आणि सराव केल्यामुळे वेल्डिंग उद्योग अधिक सशक्त होण्यास मदत होणार आहे. अमेरिकेतल्या फॅबटेक या संस्थेच्या वतीने दिल्लीतील प्रगती मैदानावर 10 एप्रिल रोजी तीन दिवसांचे ‘वेल्ड इंडिया 2014’ प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही दास यांनी दिली.

या प्रदर्शनात अमेरिका, युरोप, जपान आणि चीनमधील नामांकित वेल्डिंग उत्पादक सहभागी होत आहेत. अत्याधुनिक उपकरणे प्रदर्शनात मांडण्यात येणार असून त्याचा लाभ 40 हजारांपेक्षा जास्त भारतीय प्रदर्शकांना होणार आहे.