आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, अशी घेतली जाते कारची \'क्रॅश टेस्ट\' आणि असे दिले जाते रेटिंग!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी कार कंपनी 'मारुती सुझुकी'ची लोकप्रिय कार स्विफ्ट आणि 'निस्सान'ची डॅटसन गो या दोन्ही कार क्रॅश टेस्टमध्ये फेल ठरल्या आहेत. यामुळे या दोन्ही कारमधून प्रवास करणे असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. युरोपिय संस्थेचा 'न्यू कार असेसमेंट प्रोग्राम'च्या (एनसीएपी) माध्यमातून ही कार क्रॅश टेस्ट घेण्यात आली.


स्विफ्ट आणि डॅटसन गो क्रॅश टेस्टमध्ये नापास!


क्रॅश टेस्टमध्ये (समोरासमोरच्या धडकेच्या चाचणी) दोन्ही कारना पाचपैकी एकही स्टार मिळवता आला नाही. क्रॅससाठी ठेवण्यात आलेल्या कारच्या डमींचे जीवावर बेतणारे नुकसान झाले. स्विफ्टच्या भारतात विक्री होणार्‍या आणि लॅटिन अमेरिकेला निर्यात होणार्‍या मॉडेलची चाचणी झाली. लॅटिन अमेरिकेत बेस मॉडेलमध्येही एअर बॅग्ज असतात, भारतात मात्र नसतात.
क्रॅश टेस्टमध्ये दोन्ही कार एकमेकांना समोरासमोरुन धडक देतात. अपघातात कार आणि कारमध्ये बसणारे प्रवासी किती सुरक्षित राहतात, याविषयी आढावा घेतला जातो.

अशी घेतली जाते कार क्रॅश टेस्ट...
'न्यू कार असेसमेंट प्रोग्राम'च्या (एनसीएपी) चार प्रकारच्या टेस्ट घेते. सर्व टेस्टमध्ये डमींचा वापर केला जातो. क्रॅश टेस्टमधून समोर आलेल्या निष्कर्षांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्धारित करण्यात आलेल्या प्रोटोकॉल्सच्या आधारावर विश्लेषण केले जाते. नंतर विश्लेषणाच्या आधारावर क्रॅश टेस्टच्या निष्कर्षांनुसार कारला गुण दिले जातात.

एएनसीएपीतर्फे अन्य सेफ्टी फीचर्ससाठी बोनस पॉईंटही दिले जातात. सीट बेल्ट माइंडरसारख्या फीचर्सचा त्यात समावेश असतो. नंतर मिळालेले गुण रेटिंगमध्ये दिले जातात. यात एकपासून पाचपर्यंत रेटिंग दिले जातात. जास्त स्टार मिळणार्‍या कारला चांगले रेटिंग दिले जातात.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, क्रॅश टेस्टचे चार टप्पे...