डिजिटल मनी म्हणजे काय? मोबाइल बॅंकिंग कसे होत असेल बरे? असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडलाय ना! आज आम्ही आपल्याला डिजिटल मनी आणि मोबाइल बॅंकिंगबाबत माहिती देणार आहोत.
डिजिटल मनी नक्की कागदी नोटांसारखे नसते. विशेष म्हणजे यात रोख रकम वापरली जात नाही. कॉम्प्यूटर अथवा स्मार्टफोनच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड अथवा इंटरनेटद्वारा डिजिटल मनी इकडून तिकडे केली जाते. जर कोणी एटीएम मशिनचा वापर केला तर ही डिजिटल मनी रोख रकम होऊन जाते. डिजिटल मनी ट्रान्सफर करण्याचे काम आर्थिक सेवा पुरवणार्या कंपन्या करतात.
डिजिटल मनीच्या माध्यमातून ऑनलाइन बॅंकिंग सहज संभव आहे. यात रोख रकमेचा वापर केला जात नाही. तसेच बॅंकेतही जाण्याची गरज पडत नाही.
मोबाइल बॅंकिंग
मोबाइल बॅंकिंगचा अर्थ असा की मोबाइलच्या माध्यमातून बँकिंग. 'मोबाइल' प्रमाणे आपले अकाउंट नेहमी गतीमान राहते. आजच्या धावपळीच्या दुनियेत मोबाइल बँकिंगमुळे वेळेची मोदी बचत होत असते. बॅंकेत जाऊन रांगेत उभे राहाण्याच्या कटकटीतून सुटका होते. मोबाइल बॅंकिंगचा लाभ कधीही कुठेही तसेच कोणत्याही परिस्थितीत घेता येतो. मोबाइल बॅंकिंग आपल्या मोबाइलमध्ये 'एसएमएस' अथवा वॅपच्या माध्यमातून अपडेट करता येते. मोबाइल बॅंकिंगचा एक भाग म्हणजे 'एसएमएस बॅंकिंग' आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, सविस्तर वृत्त...