आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What Is For Becoming A Good Mf Investor In 2013 ?

2013 मध्ये अधिक चांगले एमएफ गुंतवणूकदार होण्यासाठी काय करावे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नव्या वर्षाची सुरुवात असल्याने तुमच्या म्युच्युअल फंडांमधील (एमएफ) गुंतवणुकीचा आढावा घेण्यासाठी ही चांगली वेळ आहे. हे ध्यानात घ्यायला हवे की एमएफ गुंतवणूक हा गतिशील आणि सोपा पर्याय असला तरी एमएफ गुंतवणूकदारांनी योग्य धोरण आणि तत्त्वज्ञान पाळणे आवश्यक असते. जर तुम्ही गुंतवणुकीचा योग्य मार्ग अवलंबत नसाल तर 2013मध्ये काय करावे, हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.

तुमची जोखीम पार्श्वभूमी ठरवून घ्या
यथायोग गुंतवणूक धोरण आखताना जोखीम सुसह्यता या घटकाची भूमिका लक्षणीय असते. खरे तर स्वीकारलेली जोखीम आणि त्यामुळे होणारा फायदा यामध्ये योग्य संतुलन राखणे हेच गुंतवणूक यशस्वी होण्याचे गमक आहे. म्हणूनच तुमची जोखीम पार्श्वभूमी ठरवण्यासाठी तुम्ही योग्य प्रक्रियेचा अवलंब करायला हवा. त्यासाठी काही

मार्गदर्शक सूचना अशा आहेत : तुम्ही किती प्रमाणात अस्थिरता सहन करू शकता, त्याची योग्य पातळी ठरवणे आवश्यक आहे. थोडक्यात, संभाव्य घसरण व संभाव्य चढ यांच्या परिणामांचा तुम्ही गंभीरपणे विचार करायला हवा. जोखीम सुसह्यतेची पातळी निश्चित करून तुम्ही प्रभावी विविधविस्ताराच्या तत्त्वांना धरून राहायला हवे. त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारची जोखीम/फायदा उद्दिष्टे साध्य करण्यास आणि निवेशसंचाची एकूण जोखीम कमी करण्यास मदत होईल.
तुमच्या जोखीम सुसह्यतेचे निर्धारण तुम्ही किमान वर्षातून एकदा करायला हवे. हे ध्यानात घ्या की काही वेळा जोखीम सुसह्यतेमध्ये बदल होण्याची शक्यता असते. परताव्याच्या उद्दिष्टांमध्ये मोठे बदल झाल्यास किंवा तुमच्या सध्याच्या परिस्थितीत ठरवलेली जोखीम सुसह्यता योग्य ठरत नसल्याची जाणीव झाल्यास जोखीम सुसह्यतेत बदल होतो.

योग्य मालमत्ता नियतन धोरणाचे पालन करा
मालमत्ता नियतन म्हणजे तुमच्या निवेशसंचाचे विभाजन विविध प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये करण्याची पद्धत होय. दुस-या शब्दांमध्ये सांगायचे तर मालमत्ता नियतनामुळे जोखीम नियंत्रित होण्यास मदत होते, कारण विभिन्न मालमत्ता वर्ग महागाई, चढते किंवा उतरते व्याजदर, बाजाराचा एखादा घटक लोकांच्या नजरेतून चांगला किंवा वाईट ठरणे अशा घटकांना विभिन्न प्रतिसाद देतात. एकंदरीने तुम्ही कोणत्या प्रकारची जोखीम स्वीकारत आहात आणि तुम्ही त्या प्रमाणात किती फायद्याची अपेक्षा करत आहात, हे मालमत्ता नियतनावरून ठरते. निवेशसंचातील बहुतांश उत्पन्न गुंतवणूक पर्याय निवडण्यावरून नव्हे तर मालमत्ता नियतनावरून ठरत असते, हे एक सिद्ध वास्तव आहे.
सामान्य विविधविस्तारापेक्षा मालमत्ता नियतन वेगळे आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्या निवेशसंचामध्ये 5 इक्विटी फंड एकाच प्रकारच्या गुंतवणूक धोरणांनी/तत्त्वज्ञानाने संचालित असतील किंवा त्यांची गुंतवणूक लार्ज, मिड किंवा स्मॉल कॅप यापैकी एकाच मार्केट कॅप विभागाच्या स्टॉक्समध्ये असेल तर तुमच्या निवेशसंचाची जोखीम नियंत्रित होण्याच्या दृष्टीने विशेष काही घडणार नाही. प्रतिकूल प्रतिक्रिया देण्याची वेळ आली तर हे सगळे फंड एकाच प्रकारची प्रतिक्रिया देतील. या उलट, परिस्थिती कोणतीही असली तरी विभिन्न मालमत्ता वर्ग विभिन्न प्रकारची प्रतिक्रिया देतील.

मालमत्ता नियतनाचा यशस्वी अवलंब करण्यासाठी म्युच्युअल फंड्स हे सर्वात योग्य साधन आहे. ते केवळ विविधविस्ताराचा लाभ देतात इतकंच नाही, तर विविध वयोगटातील विविध व्यवसायांमधील गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक उद्दिष्टांशी सुसंगत अशा विभिन्न मुदतींची गुंतवणूक उद्दिष्टे देऊ करणारे ‘फंड परिवार’ आहेत. शिवाय आपल्या परिस्थितीत बदल होईल त्यानुसार निवेशसंचाचे पुन:संतुलन करण्याची संधीही हे फंड देतात.

विविध मार्केट कॅप्समध्ये
योग्य प्रमाणात गुंतवणूक करा

एखाद्या कंपनीचे मार्केट कॅप तिच्या बाजारमूल्याचे निदर्शक असते. हे मूल्य म्हणजे शेअर्सची एकूण संख्या आणि शेअर्सची सध्याची किंमत यांचा गुणाकार होय. हा स्टॉक कशा प्रकारचे उत्पन्न देईल आणि या शेअर्समुळे तुम्हाला कशा प्रकारच्या अस्थिरतेचा किंवा जोखमीचा सामना करावा लागेल, यामध्ये या मूल्याची महत्त्वाची भूमिका असते. उदाहरणार्थ, अस्थिरतेच्या वातावरणात मोठ्या कंपन्या सामान्यत: अधिक स्थिर असतात आणि मिड कॅप व स्मॉल कॅप कंपन्या डळमळीत होतात.

प्रत्येक विभागासाठी नेमके किती नियतन करावे, याचे निश्चित प्रमाण देता येणार नाही. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी ते वेगवेगळे असेल. प्रत्येकाची जोखीम पार्श्वभूमी, गुंतवणूक मुदत आणि गुंतवणूक उद्दिष्टे वेगवेगळी असतात. म्हणूनच तुम्ही प्रथमच गुंतवणूक करत आहात की या आधीच तुम्ही गुंतवणूक केलेली आहे, यानुसार तुमचे नियतन बदलेल. विद्यमान गुंतवणूकदारांच्या अस्तित्वात असलेल्या नियतनाचाही विचार करावा लागतो. नव्या गुंतवणूकदारासाठी सुरुवात करण्याचा योग्य मार्ग म्हणजे, अधिकाधिक गुंतवणूक लार्ज कॅप स्टॉक्समध्ये करणे आणि थोडी गुंतवणूक मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये करणे, असा असतो.
नियतन ठरवण्यासाठी तसेच वेळोवेळी निवेशसंचाचे पुन:संतुलन करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे नेहमीच श्रेयस्कर असते. मात्र एक गुंतवणूकदार म्हणून या प्रक्रियेमध्ये तुमची भूमिकाही महत्त्वाची असते. कारण गुंतवणुकीपासून स्थूलमानाने काय साध्य व्हावे, याबाबतच्या तुमच्या अपेक्षांनुसार योग्य ते नियतन व्हावे लागते.

सीईओ वाइजइन्व्हेस्ट अ‍ॅडवायझर्स प्रा. लि.
hrustagi@yahoo.com