आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असेट अलोकेशन म्हणजे काय?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंतवणुकीचे विविध पर्याय किंवा गुंतवणुकीच्या साधनाला असेट क्लास असे म्हणतात. आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार गुंतवणूकदाराने एका किंवा अधिक असेट क्लासेसमध्ये गुंतवणूक करावयाची असते. म्हणजेच गुंतवणुकीची विभागणी/अलोकेशन करावयाचे असते. जोखीम व परताव्याचे संतुलन साधण्यासाठी बचतीची गुंतवणुकीच्या साधनांमध्ये विभागणी करणे, ती करताना गुंतवणूकदाराची आर्थिक उद्दिष्टे, जोखीम क्षमता, वय, गुंतवणुकीचा कालावधी अशा अनेक गोष्टींचे भान ठेवणे म्हणजे असेट अलोकेशन साधारणपणे म्हणता येईल. आपले असेट अलोकेशन काय असावे याचे तयार उत्तर नाही. कारण ते प्रत्येक गुंतवणूकदारासाठी वेगळे असते, पण एकदा का योग्य ते असेट अलोकेशन केले गेले की मात्र आर्थिक उद्दिष्टे पूर्ण व्हायची शक्यता एकदम वाढते.


वयानुसार असेट अलोकेशन कसे असावे
1) वय वर्षे 1८ ते 2७ - या वयात लग्न झालेले नसते. गुंतवणूक करताना जास्त जोखीम घेता येते; अर्थात पैसे कमी असू शकतात. या वयात निवृत्तीसाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीसाठी मोठा कालावधी मिळतो. त्यामुळे दीर्घ मुदतीसाठी पैसे शेअर्स / रिअल इस्टेट / म्युचुअल फंड्स मध्ये गुंतवता येतात. इथे परतावाही जास्त मिळू शकतो.
2) वय वर्षे 1८ ते 32 - नवीन लग्न होऊन जबाबदारी वाढलेली असते. थोड्या तरतेची, सुरक्षेची गरज वाटते त्यामुळे थोडा भाग फिक्स्ड इन्कम (FD/PPF) निश्चित मुदत ठेवींमध्ये गुंतवावा. विम्याचाही विचार होऊ शकतो.
3) वय वर्षे 33 ते 50 - अजूनही तुम्ही मोठी जोखीम घेऊ शकता, पण परतावा स्थिर करण्यासाठी थोडी गुंतवणूक डेट / बाँड्समध्ये करावी, काही पैसे इक्विटी म्युचुअल फंड्स मध्ये ठेवावेत. मुले झालेली असतात व जबाबदारी अजून वाढलेली असते. आयुष्यालाही स्थिरता आलेली असते.
4) वय वर्षे 51 ते ६5 - निवृत्ती समोर दिसत असते .वाढत्या वयाबरोबर जोखीम घ्यायची क्षमताही कमी होऊ शकते. हळूहळू आपले पैसे डेटकडे वळवावेत. तरी अजून गुंतवलेल्या पैशांची गरज आहे अशी गोष्ट नसते. 3/4 पैसे डेट व निश्चित उत्पन्न देणा-या मुदत ठेवींमध्ये ठेवता येतील.
5) वय वर्षे ६६ व पुढे - आयुष्यभर केलेल्या गुंतवणुकीची फळं तुम्ही चाखत असाल, परंतु आता सर्वच पैसे डेटमध्ये करण्यापेक्षा काही पैसे इक्विटी म्युचुअल फंड्समध्ये किंवा शेअर्समध्येही ठेऊ शकता. कारण वाढती आयुर्मर्यादा व चलनवाढीचा धोका यांना तोंड द्यायचे असते. चलनवाढीचा सामना करण्याची क्षमता जास्त जोखीम असणा-या गुंतवणूक साधनांमध्ये असते. अर्थात आता गुंतवणुकीत सुरक्षितता / स्थिरता महत्त्वाचीच असते.
अशाप्रकारे वयाबरोबर असेट अलोकेशनचे संदर्भही बदलतात. आता काही उदाहरणे पाहू.
अ) श्री. अमोल काळे यांचे वय 25, चांगल्या पगाराची नोकरी व जास्त जोखीम घेण्याची इच्छा. यांचा गुंतवणूक पोर्टफोलिओ आक्रमक असेल. याचे वैशिष्ट्ये म्हणजे यात वृद्धीवर भर असतो व गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी केली जाते. साधारणपणे ७0% शेअर्स / इक्विटी म्युचुअल फंड्स, 20% बाँड्स / फिक्स्ड इन्कम व 10 % कमी कालावधीच्या मनी मार्केट फंड्स इ. मध्ये गुंतवणूक केली जाते. दीर्घ मुदतीची आर्थिक उद्दिष्टे उदा. निवृत्ती यासाठी आक्रमक पोर्टफोलिओचा वापर केला जातो. या पोर्टफोलिओचा स्त्री चार्ट असा दिसेल.
ब) सौ. स्मिता पाटील यांची इतकी जोखीम घेण्याची इच्छा नाही. त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये वृद्धी व स्थिरता यांचा समतोल साधायचा प्रयत्न असतो. यात 50% शेअर्स/ इक्विटी म्युच्युअल फंड्स, 30 % फिक्स्ड इन्कम व 20 % कमी मुदतीचे बाँड्स/ कॅश इ. मध्ये गुंतवणूक केली जाते. चलनवाढीचा सामना करण्यासाठी यातल्या इक्विटी भागाची मदत होते तर इक्विटीची अस्थिरता कमी करण्यासाठी डेट बाँड्सचा उपयोग होतो. याचा चार्ट पाहूया.
क) श्री राजीव कुलकर्णी हे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांचा पोर्टफोलिओ अजून कमी जोखमीचा आहे. 50% बाँड्स / फिक्स्ड इन्कममध्ये, 30% कमी मुदतीच्या मनी मार्केट फंड्समध्ये तर 20% गुंतवणूक इक़्विटी म्युचुअल फंड्समध्ये केली आहे. स्त्री चार्ट मध्ये ती अशी दिसेल. आपला गुंतवणूक पोर्टफोलिओ बदलत्या काळाशी सुसंगत हवा. तसेच असेट अलोकेशनही काळानुसार बदलू शकते. त्यासाठी वर्षातून दोनदा तरी आपल्या गुंतवणूक एजंटसोबत बसून गुंतवणूक पोर्टफ़ोलिओचे पुनरावलोकन व नियोजन करायला हवे.