आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातरुणाईवर टेक्नॉलॉजीने इतका प्रभाव आहे की, चार मित्र सहज गप्पा मारायला एकत्र बसले तरी त्यांचे फोन लगेच बाहेर निघतात. व्हॉट्स अॅपवरचं चॅटिंग, फेसबुकवर स्टेटस अपडेट करत, सतत जगाच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. मोबाइलचे जणू व्यसनच लागलेल्या तरुणाईला यातून बाहेर काढण्यासाठी दुसरे अॅप्लिकेशन्सच मदतीला धावून आले आहेत. मोबाइलच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी ‘अॅप’का अॅडिक्शन दूर करण्यासाठी काही अँप्स मोफत डाऊनलोड करता येतात. गाणी, इंटरनेट, गेम्स, व्हिडिओ, फोटो आशा अनेक गोष्टी हाताच्या मुठीत मावणार्या मोबाइलमध्ये आल्यानंतर तरुणाईला त्याचे वेड लागले आहे. सतत चॅटिंग करत राहणे, अपडेट करत राहणे, सर्फिंग-सर्चिंग करत राहणे यातून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळणे कठीणच आहे. मोबाइलचे व्यसन कमी करण्यासाठी चक्क काही अॅप्स बाजारात आली आहेत. एसएमएसच्या वापरावर मर्यादा घालण्यात आली असली तरी सोशल नेटवर्किंग आणि फ्री मेसेजिंगचा आज मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. मोबाइलच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी काही अॅप्स आहेत.
असे वापरा अॅप्स
व्हॉट्सअपसारखे मेसेंजर वापरायची सवय एकदा लागली की त्यातून बाहेर पडणे अनेकांना कठीण जाते. मोबाइलच्या स्क्रीनकडे सतत बघत राहणे डोळ्यांच्या आरोग्यासाठीही घातक असते. त्यामुळे त्याच्या वापरावर मर्यादा घालायची असेल, तर व्हॉट्सअप हे अॅप तुम्हाला मदत करू शकेल. यात फोन वापरण्यासाठी एक विशिष्ट वेळ सेट करावी लागते. ती वेळ संपली की फोन बंद करण्यासाठी स्क्रीनवर सूचना येऊ लागतात. एवढे करूनही तुमचे अॅडिक्शन संपत नसेल तर मात्र थोड्या वेळाने काही वेळासाठी फोन बंद करण्याची सोय यात केलेली आहे. वेळेचे महत्त्व स्पष्ट करणारे काही संदेश मोबाइलवर झळकत राहतात. या अँप्स तयार करण्यामागील एकमेव उद्देश असा की, टेक्नॉलॉजीचा वापर गरजेपुरता करून इतर वेळी आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांशी बोलावे, त्यांच्याशी संवाद साधावा एवढाच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.