आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Whatsapp Blue Ticks Can Be Hide Like Last Seen Options

Whatsapp युजर्ससाठी गुडन्युज, तुम्हाला ब्लू टिकही हाईड करता येईल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Whatsapp चे लेटेस्ट व्हर्जन सध्या बाजारपेठेत आले आहे. गुगल अॅप स्टोअरवरुन हे व्हर्जन स्मार्टफोनवर डाऊनलोड करता येते. यातील विशेष फिचर म्हणजे मेसेजच्या शेजारी येणारी ब्लू टिक. एका युजर्सने दुसऱ्या युजरला मेसेज पाठवला आणि दुसऱ्या युजरने तो वाचला तर त्या शेजारी असलेल्या टिक ब्लू रंगाच्या होतात. त्यामुळे मेसेज पाठवणाऱ्याला मेसेज वाचल्याची पोच मिळते. पण आता ही ब्लू टिकही हाईड करता येणार आहे.
Whatsapp चे युजर्सही ब्लू टिक डिसेबल करु शकतात. यासाठी प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन रिड रिसिट हा ऑप्सन डिसेबल कराला लागेल. यानंतर युजरने मेसेज वाचल्यावरही दुसऱ्याच्या स्क्रिनवर ब्लू टिक येणार नाहीत. त्यामुळे त्याला त्याचा मेसेज वाचल्याचा क्लेम करता येणार नाही.
Whatsapp मध्ये लास्ट सिन नावाचे ऑप्शन आहे. युजरने लास्ट सिन नावाचे ऑप्सन डिसेबल केल्यावर लास्ट सिनची माहिती दुसऱ्याच्या मोबाईलवर मिळत नाही. अगदी अशाच स्वरुपाचे ब्लू टिकचे ऑप्शन आहे. या दोन्ही सुविधांमुळे ग्राहकांना आपली पसंती जपता येणार आहे.
ब्लू टिक डिसेबल करण्यासाठी
Settings > Account > Privacy > Disable the ‘Read Receipts’ option
लास्ट सिन डिसेबल करण्यासाठी
Settings > Account > Privacy > Disable the ‘Last Seen’ option
पण यासाठी तुम्हाला Whatsapp चे 2.11.444 Version (WhatsApp च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे) तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करावे लागेल.