आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Whatsapp Co Founder Jan Koum Success Story And Facts

एके काळी दुकानात फरशी पुसायचा Whatsappचा को-फाउंडर, आज आहे अब्जाधीश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: जैन कुम)
नवी दिल्ली- 'फेसबुक' आणि 'वॉट्सऐप'मध्ये गेल्या फेब्रुवारीमध्ये डील झाली. सुमारे 19 अब्ज डॉलर्समध्ये (1159 अब्ज रुपये) ही डील झाली होती. या डीलमुळे 'वॉट्सऐप'चे को-फाउंडर जैन कुम (jan Koum) आणि ब्रायन एक्टन (Brian Acton) हे दोघे अब्जाधीश झाले.

जैन कुम याचा जीवनप्रवास संघर्षपूर्ण आहे. जैन याने किशोरावस्थेत खूप गरीबी पाहिली आहे. आपल्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाटी जैन आणि त्याच्या आईला मोलमजुरी करावी लागत होती. काही काळ जैन याने एक दुकानात साफ-सफाईचेही काम केले. एवढेच नव्हे तर त्याला फरशी देखील पुसावी लागली होती.

'फेसबुक'ने 'वॉट्‍सअॅप' खरेदी केल्यानंतर सर्व टॅक्स वजा जाता जैन कुल याला 6.8 अब्ज डॉलर्स (415 अब्ज रुपये) तर ब्रायन एक्टन याला 3.5 अब्ज डॉलर्स (213 अब्ज रुपये) मिळाले. यासोबत जैन कुम 'फेसबुक'च्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये सहभागी झाला आहे.

भविष्यात जैन हा 'वॉट्सअॅप'चा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. जैन कुम हा फेसबुकचा मालक मार्क जुकरबर्गप्रमाणे एक डॉलर सॅलरी घेणार आहे. तसेच ब्रायन एक्टन आणि जैन कुम या दोघांना चार वर्षांपर्यंत वॉट्‍सअॅपचा नफ्यात हिस्सा मिळणार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, 'वॉट्सअॅप'ची जन्मकथा आणि को-फाउंडरची संघर्षपूर्ण जीवन प्रवास...