आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्हॉट्स अँप’मुळे ग्राहकांची दिवाळी, कंपन्यांचे दिवाळे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सणासुदीच्या काळात आप्तेष्टांना शुभेच्छा देण्यासाठी आधुनिक काळात मोबाइल एसएमएस हे सर्वांत प्रभावी माध्यम असले तरी ही सेवा पुरवणार्‍या कंपन्यांची ‘व्हॉट्स अँप’मुळे चांगलीच अडचण झाली आहे. एरवी मोफत एसएमएस; परंतु उत्सवकाळात प्रत्येक एसएमएसमागे 1 रुपया कमावणार्‍या कंपन्यांना यंदा चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे.

मोबाइल इंटरनेटचा वापर वाढत गेल्याने हे युर्जस नवनवीन अँपचाही वापर करू लागले. मित्र, नातेवाईक आणि व्यावसायिक संवादांसाठी या अँपचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा ही मानसिकता दृढ होत असताना ‘व्हॉट्स अँप’सारखे अँप्लिकेशन या युर्जसच्या हाती लागले आहे. यंदाच्या दिवाळीत ‘व्हाट्स अँप’ने बाजी मारली. मेसेज सुविधेबरोबरच फोटो व व्हिडिओ शेअर करण्याच्या सुविधेमुळे एसएमएस सेवा देणार्‍या कंपन्यांकडे ग्राहकांनी यंदा पाठ फिरवली. प्रारंभिक माहितीनुसार कंपन्यांचा हा व्यवसाय यंदा 80 टक्के कमी झाला आहे.