अ‍ॅन्ड्राइड स्मार्टफोनच्या WhatsApp / अ‍ॅन्ड्राइड स्मार्टफोनच्या WhatsApp युजर्सनो सावधान, लीक होऊ शकते तुमची CHAT HISTORY

Mar 13,2014 08:02:00 PM IST

तुम्ही अ‍ॅन्ड्राइड स्मार्टफोनवर व्हॉट्स अ‍ॅप वापरत असाल तर काहीही शेअर करण्याआधी विचार करा. एक सामान्य अ‍ॅप आणि काही स्क्रिप्टस् ( कॉम्प्यूटर प्रोग्राम कोड ) वापरून हॅकर्स तुमचे मॅसेज, फोटो आणि व्हिडीओ पाहू शकतात.

बेस बासर्ट या टच सिक्युरिटी कंसलटंटने एक खुलासा केला आहे. त्यांच्यामते मेमरी कार्डमध्ये सेव्ह असणारे व्हॉट्सअ‍ॅपचे चॅट मॅसेज दूस-या अ‍ॅपच्या मदतीने वाचता येतात.


काय आहे कारण -
याचे कारण व्हॉट्स अ‍ॅपच्या अ‍ॅन्ड्राइड व्हर्जनमध्ये असणारा सिक्यूरिटी इश्यू आहे. अ‍ॅन्ड्राइड स्मार्टफोनमध्ये व्हॅटस् अ‍ॅपचे जे मॅसेज मेमरी कार्डमध्ये सेव्ह असतात ते सहजतेने अ‍ॅक्सेस करता येतात.

इंटरनेटवर अपलोड होऊ शकते चॅट -
बेसनूसार अ‍ॅन्ड्राइड स्मार्टफोन यूजर्सचे चॅट केवळ वाचताच येत नाही तर थर्ड पार्टी सर्व्हवर ते अपलोडही करता येते. याचा अर्थ एका क्लिकने तुमचे व्हॅट्सचे पर्सनल चॅट अपलोड केले जाऊ शकते.

काय काय होऊ शकते आणि यांच्यापासून कसे वाचावे... जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

कोणकोणत्या अॅपवर हे काम करता येते. व्हॉट्स अॅपचे चॅट मॅसेज जर SD कार्डवर सेव्ह असणारे मॅसेज कोणत्याही अॅप्लीकेशनवर वाचता येतात. मात्र हे यूजर्सना SD कार्डवर बदल करण्याची परवानगी मागते. गुगल प्लेवरून अॅप डाउनलेड केल्यानंतर ते इन्स्टॉल करण्यासाठी यूजर्सना विविध परमिशन द्याव्या लागतात. व्हॅट्स अॅप इंस्टॉल करतानाही यूजर्संना परमिशन द्यावी लागते. अॅन्ड्राइडमधील त्रुटी अॅन्ड्राइड ऑपरेटिंग सिस्टमवर एक सर्वात मोठी कमतरता म्हणजे स्मार्टफोनमध्ये हे अॅप सेव्ह करताना SD कार्डचा पूर्ण कंन्टेंड अॅक्सेक द्यावा लागतो किंवा काहीजण न अॅक्सेस करण्याची परवानगी देत नाही. अॅन्ड्राइड अॅपमध्ये फक्त सलेक्ट करून कंटेंटमध्ये बदल करण्याची सुविधा मिळत नाही.WhatsApp Xtract बेसनूसार व्हॉट्स अॅपचे जे मॅसेज एनक्रिप्ट असतात ते हॅकर्स सहजासहजी डी-कोड करू शकतात. असे करण्यासाठी एक खास थर्ड पार्टी टूल उपलब्ध आहे. या टूलचे नाव WhatsApp Xtract आहे. काय करावे लागेल व्हॉट्स अॅपचे मॅसेज चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी प्रत्येक अॅपला SD कार्डवर अॅक्सेस न देणे हा पर्याय आहे. बेसने फ्लॅशी बर्ड क्लोन अॅपचे उदाहरण दिले आहे. अशा अॅपसना तुम्ही SD कार्डचा अॅक्सेस दिला तर प्रायव्हसीला धोका असतो.WhatsApp सुरक्षित आहे का? WhatsApp खरेच सुरक्षित आहे का हा चर्चेचा मुद्दा ठरू शकतो. WhatsApp सारखे एनक्रिप्शन सर्विसेस सुरक्षीत नसल्याचा इंटरनेट सिक्यूरिटी फर्म प्रेटोरिएनचे म्हणणे आहे. हॅकर्स सहजतेने अशा अॅप्समधून युजर्सचा डाटा सहज हॅक करू शकतात. कसे हॅक होऊ सकते WhatsApp - सार्वजनिक वाय-फायचा वापर करून - मोबाइलचा IMEI क्रमांक माहिती करून - मोबाइल नंबर वरून कसे वाचाल या पासून - सार्वजनिक वाय-फायचा वापर न करता - अननोन नंबर ब्लॉक करा. - राऊटरचा पासवर्ड सतत बदला.
X