नवी दिल्ली- WhatsAap च्या युजर्सना खुशखबर आहे. त्यांना लवकरच 'फ्री व्हाइस कॉलिंग' सेवाचा लाभ मिळणार आहे. 'Hike' नंतर आता WhatsAap ने देखील
आपले व्हाइस कॉलिंग फीचर लॉन्च केले आहे. ही सेवा मोफत असेल, अशी माहिती मिळाली आहे. सध्या या सेवेची चाचणी सुरु असून ही सेवा लवकरच सर्व WhatsAap युजर्सना मिळणार आहे.
अल्पावधीत लोकप्रिय झालेले इंस्टेंट मॅसेजिंग अॅप Whatsaap ने यापूर्वी WhatsAap Web व्हर्जन लॉन्च केले होते. त्यानंतर आता व्हाइस कॉलिंग फीचर सादर करण्याचे संकेत दिले आहे. WhatsAapची नवी सेवा फक्त अँड्रॉइड यूजर्ससाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे iphone च्या iOS या सेवेला सपोर्ट करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. WhatsAap च्या 'फ्री व्हाइस कॉलिंग' सेवेसाठी iphone युजर्सला आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, या ऑपरेटिंग सिस्टमवर आले WhatsAap चे नवे फीचर्स...