आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WhatsApp Takes Aim At The Phone Call: App Set To Add Voice Messaging Within Months

आता NOKIA ही ANDROID प्‍लॅटफॉर्मवर; \'WhatsApp\'मधून साधता येईल संवाद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्सिलोना (स्पेन)- मोबाइल वर्ल्ड कॉन्फेरन्स (MWC 2014) अनेक नवे गॅझेट लॉन्‍च झाले आहेत. सॅमसंगने आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन गॅलक्सी S5 लॉन्च केला आहे. याशिवाय गॅलक्सी 2 आणि गिअर 2 निओ स्मार्टवॉच लॉन्च झाले आहेत. अस्तित्त्वाच्या लढाईने झपाटलेल्या नोकियाने अँड्रॉइड प्‍लेटफॉर्मवर तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. याबरोबर नोकियाने 'आशा सीरीज'मध्ये दोन नवे स्मार्टफोनदेखील लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे WhatsApp चे सीईओ जन कुम यांनी एक अनोखी घोषणा केली आहे. WhatsAppच्या माध्यमातून यूजर्सला लवकरच एकमेकांशी संवादही साधता येणार आहे.


WhatsApp पहिल्यांचा व्हाइस मेसेज सेंड आणि रिसीव्ह करण्याची सुविधा देत आहे. मात्र, WhatsApp च्या या निर्णयाला दोन फोन कंपन्यांकडून आव्हान मिळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. WhatsAppचे सीईओ जन कुम म्हणाले, अँड्रॉइड आणि आयफोनवर पुढील काही दिवसांत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, ब्‍लॅकबेरी, मायक्रोसॉफ्ट आणि नोकिया फोनसाठी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.


दरम्यान, WhatsApp aRdul व्हाइस फंक्‍शन आहे. मात्र सध्या त्यात केवळ व्हाइस सेंड करता येतो. नवी सुविधा लवकरच सुरु केली जाणार आहे. ही सुविधा सुरु झाल्यानंतर फोनवर ज्याप्रमाणे आपण बोलतो अगदी तशाप्रकारे WhatsApp च्या माध्यमातून बोलता येणार आहे .

सोशल मीडियातील सगळ्यात अग्रेसर साइट फेसबुकने WhatsApp ला खरेदी करण्‍याचा नुकताच निर्णय घेतला आहे.