आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रेडिट कार्डचा अनावश्यक वापर केव्हा टाळावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रेडिट कार्ड हे आधुनिक काळातील सर्वात महत्त्वाचे वित्तीय साधन आहे. मात्र याचा उचित वापर न केल्यास ते आपल्या डोकेदुखीचे कारण बनू शकते.वस्तूंच्या वारंवार खरेदीसाठी कार्ड वापरल्यास खर्चात वाढ होते. त्याचा मासिक बजेटवर परिणाम होऊ शकतो. आर्थिक स्थिती उत्तम राखण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केव्हा टाळावा याबाबत...
० दैनंदिन खर्चासाठी
काही लोक दैनंदिन वस्तूंची खरेदीही क्रेडिट कार्डद्वारे करतात. तसे पाहिले तर किराणा आणि घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी नेहमीच या कार्डचा वापर अयोग्य ठरत नाही. मात्र अशा वस्तूंच्या वारंवार खरेदीसाठी कार्डचा वापर केल्यास खर्चात वाढ होऊ शकते आणि त्याचा मासिक बजेटवर परिणाम होऊ शकतो.
० आगाऊ रोख रकमेसाठी
आपत्कालीन परिस्थितीत एटीएमच्या माध्यमातून क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढणे योग्य असले तरी याचा आपल्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होतो हे कधी विचारात घेतले आहे का? आपण काढलेल्या पैशांवर 2.5 ते 3.5 टक्के व्याज लागते. एवढेच नव्हे तर पैसे काढल्याच्या दिवसापासून या व्याजाची आकारणी होते. त्याशिवाय फ्लॅट ट्रान्झेक्शन शुल्क लागते ते वेगळेच.
० रोख रकमेची चणचण असेल तर
क्रेडिट कार्डवर 20 ते 50 दिवसांचा मोफत क्रेडिट कालावधी मिळतो. मात्र, मुदतीत बिल भरले नाही तर विलंब शुल्कापोटी 2.5 ते 3.5 टक्के मासिक आधारावर व्याज आणि त्यावर कर द्यावा लागतो. मुदतीत बिल भरण्याची स्थिती असेल तेव्हा क्रेडिट कार्डचा वापर टाळावा.
० विदेशात असाल तेव्हा
विदेशात असताना क्रेडिट कार्डचा व्यवहारासाठी वापर केल्यास सर्व व्यवहार विदेशी चलनात करावे लागतात. यासाठी चलनातील चढ-उताराकडे लक्ष असावे. अशा वेळी क्रेडिट कार्डऐवजी प्रीपेड करन्सी कार्डचा वापर करणे जास्त योग्य राहील.
० केवळ रिवॉर्ड पॉइंट्ससाठी कार्डचा वापर : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कार्ड कंपन्या प्रत्येक खरेदीवर रिवॉर्ड पॉइंट्स देतात. रिवॉर्ड पॉइंट्स मिळवणे चांगले असले तरी केवळ या पॉइंट्ससाठी खरेदी करणे योग्य नव्हे. जास्तीचे रिवॉर्ड पॉइंट्स जरी मिळत असले तरी बिल भरावे लागते हे लक्षात ठेवा.
० असुरक्षित संकेतस्थळावरून खरेदी
ऑनलाइन खरेदीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र, असुरक्षित संकेतस्थळावरून खरेदी टाळावी. अशा खरेदीच्या वेळी क्रेडिट कार्डद्वारे पैसे देताना नेहमी सुरक्षा पातळी तपासावी.
० पूर्ण क्रेडिट लिमिट वापरावे
अशा स्थितीत क्रेडिट कार्डचा वापर टाळावा. एक तर क्रेडिट स्कोअरसाठी हे चांगले आहे, शिवाय त्यामुळे खर्चही नियंत्रणात राहण्यास मदत होते.
० सवलतीपासून दूर
भारंभार खरेदी टाळा. यामुळे आपला खर्च एका मर्यादेच्या वर जाणार नाही. समजा क्रेडिट कार्डद्वारे मोठी खरेदी केली तर कर्ज वाढेल. त्यामुळे तुमच्या खिशावर परिणाम होईल.
० अनेक कार्ड असतील तर
एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील तर प्रत्येक कार्डचे बिलिंग सायकल आणि बिलाची मुदत याकडे लक्ष द्या. बिलाच्या तारखेपूर्वी मोठी खरेदी टाळा. ज्या कार्डची बिल भरण्याची तारीख लांब असेल असे कार्ड या वेळी वापरा. यातून तुम्हाला क्रेडिट कालावधी मिळेल आणि आर्थिक ताणही येणार नाही.
लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.