आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाऊक महागाई शून्यावर! नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई दर ० टक्के

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजीपाला, इंधन या दाेन प्रमुख जीवनावश्यक वस्तूंच्या किमती घसरल्यामुळे नाेव्हेंबर महिन्यात घाऊक महागाई शून्य पातळीवर आली आहे. जवळपास पाच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महागाईचा दिलासा मिळाल्याने आता रिझर्व्ह बँकेवरदेखील व्याजदर कपातीचा दबाव येण्याची शक्यता आहे.

घाऊक िकमतीवर आधारित महागाईचा िनर्देशांक गेल्या वर्षातल्या नाेव्हेंबरमधील ७.५२ टक्क्यांवरून यंदाच्या आॅक्टाेबरमध्ये १.७७ टक्क्यांवर आला आहे. भाजीपाला, िवशेषकरून खाद्य तेल, पेट्राेल आणि िडझेलच्या िकमती कमी झाल्यामुळे महागाई माेठा िदलासा देऊ शकली आहे.

घाऊक महागाईने सलग सहा महिने घसरणीचा कल दाखवला आहे. त्यामुळे उद्याेग क्षेत्राकडून आता व्याजदर कपातीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. महागाईतील घट कायम राहिली आणि सरकारने वित्तीय तूट आटाेक्यात ठेवण्यासाठी पावले उचलली तर पुढील वर्षाच्या प्रारंभी व्याजदर कपातीचा िवचार करता येईल, असे िरझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या अगाेदरच्या महिन्यात पतधाेरण आढावा जाहीर करताना सांिगतले हाेते.

कर्ज स्वस्ताईसाठी दबाव :
किरकोळ महागाई पाठोपाठ घाऊक महागाईने जोरदार घसरणीचा कल दाखवला. घाऊक महागाई आता पाच वर्षांच्या नीचांकावर आली आहे. त्यामुळे प्रमुख व्याजदरात कपात करुन कर्ज स्वस्त करण्याचा दबाव रिझर्व्ह बँकेवर वाढला आहे. महागाईचे कारण देत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आतापर्यंत वायज कपात टाळली होती. आता दोन्ही महागाई आटोक्यात आल्याने कर्ज स्वस्त करावे अशी जोरदार मागणी उद्योद जगताकडून होत आहे.

घाऊक महागाईत लक्षणीय घट झाल्यामुळे आता औद्याेगिक उत्पादनांची मागणी वाढवण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कपात हाेण्याची गरज आहे. असोचेम