आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why E Commerce Company Choose Kart And Deal Words In Their Name

ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी आपल्या नावापुढे का लावतात, \'KART\' आणि \'DEAL\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'नाव' हे व्यक्ती अथवा संस्थेला ओळख देत असते. नावातच कंपनीची प्रगती आणि अधोगती असते, असेही म्हटले जाते. नावाच्या बळावरच व्यक्ती अथवा संस्थेचा यशाचा आलेख उंचावत असतो. ई-कॉमर्स इंडस्ट्रीत काही कंपन्यांच्या नावापुढे 'कार्ट' आणि 'डील'सारखी नावे जोडलेली असतात. कंपन्या अशी नावे का वापरता, याचे गणित काय असावे. 'कार्ट' आणि 'डील' अशा शब्दांचाच वापर का केला जातो, या मागील रहस्य आम्ही आपल्याला सांगणार आहोत
'फ्लिपकार्ट' आणि 'स्नॅपडील' हे शब्द सध्या जास्त प्रचलीत झाली आहेत. 'फ्लिपकार्ट' आणि 'स्नॅपडील'चे प्रथित यश पाहून ई-कॉमर्स क्षेत्रात पदार्पण करणार्‍या नव्या कंपन्या आणि 'स्टार्टअप्स' आपल्या नावाच्या पुढे 'कार्ट' आणि 'डील' अशा शब्दांचा वापर करू लागल्या आहेत. दोन्ही शब्द बाजाराशी निगडीत असल्याने या शब्दांचा वापर करून अल्पावधीत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रसिद्धी मिळवणे हा एकमेव उद्देश नसून मोठा नफा कमावणे देखील आहे. यासोबत स्वत:ला प्रस्थापित करण्‍यासाठी बहुतांश कंपन्या अशा नावांचा वापर करतात.
प्रचलित शब्द मिळवून देतात ओळख...
बहुतांश स्टार्टअप्सनुसार, 'कार्ट' अथवा 'डील' सारखी नावांमुळे ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्या अल्पावधीत आपली ओळख निर्माण करतात. 'शॉपक्ल्यूज'नुसार, ऑनलाइन क्षेत्रातील ग्राहकांना कंपनीचे प्रोफाईल सांगावे लागते. प्रॉडक्ट विकणारी कंपनी असेल आणि तिच्या नावापुढे 'कार्ट' अथवा 'डील' असे शब्द असतील, तर ग्राहक कंपनीच्या प्रोफाईलबाबत अंदाज लावून घेतात.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, 15 साइट्सने नावापुढे वापरला 'कार्ट' शब्द...

(टीप: छायाचित्रे सादरीकरणासाठी वापरले आहे.)