आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Should Corporate Houses Fighting On The Hereditory ?

कंपन्यांमध्ये का होतात उत्तराधिकारासाठी वाद?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉर्पोरेट घराण्यांमध्ये उत्तराधिकारीपदावरून होणा-या वादात देशातील चौथ्या क्रमांकाच्या ‘येस’ बँकेचा वाद सर्वात नवा आहे. अशोक कपूर व राणा कपूर या दोघांनी या बँकेची स्थापना केली होती. दोघे जवळचे नातलग. अशोक यांच्या निधनानंतर बँकेच्या अधिकारासंबंधी दोन्ही कुटुंबे समोरासमोर उभी ठाकली आहेत. उत्तराधिकारीपदाचे हे वाद का होतात?


17 हजार कोटींची येस बँक
अशोक यांच्या निधनानंतर येस बँकेत वाद सुरू झाला. ते 26/11 च्या हल्ल्यात बळी पडले होते.
राणा कपूर मात्र अशोक यांच्या कुटुंबीयांना संचालक मंडळावर घेण्यास मुळीच तयार नाहीत.
> मुंबई उच्च् न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अशोक यांच्या पत्नी मधू यांनी पतीच्या निधनानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना संचालक मंडळात स्थान मिळावे, पण राणा कपूर त्यात अडथळा ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
> राणा कपूर यांची पत्नी व मधू या दोघी सख्ख्या बहिणी आहेत.
> अशोक कपूर यांच्या निधनानंतर राणा कपूर यांनी कंपनीची नामनिर्देशन समिती परवानगी देत नसल्याच्या कारणावरून मधू यांना संचालक मंडळावर घेण्यास नकार दिला होता.
> बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तीन संचालकांची निवड झाली. त्यानंतर मधू यांनी न्यायालयात धाव घेत या निर्णयापूर्वी आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचे म्हटले. आता मधू यांची मुलगी शगुन गोगिया हा खटला लढवत आहेत.


कसे टाळावे वाद?
होय, कंपनी व्यवस्थापनाने कंपनी कायद्याचे दोन महत्त्वाचे नियम पाळले तर.
@उत्तराधिका-याचे नाव मंडळाकडून मंजूर करून घेणे.
@संचालकाचे मृत्युपत्र रजिस्ट्रार ऑफ इन्शुरन्स यांचे कडे नोंदणी आवश्यक
भारतातील आघाडीच्या 44 कंपन्यांचे सर्वेक्षण
75% मंडळांमध्ये उत्तराधिकारी पदाबाबत चर्चा होत नाही.
20% सदस्यांनी उत्तराधिकाराचे नियोजन केले आहे.


स्रोत : बेन अँड कंपनी (आंतरराष्‍ट्रीय कन्सल्टन्सी फर्म)

बिर्ला विरुद्ध लोढा : प्रत्येक वादाचे मूळ सारखेच
* बिर्ला यांची 5 हजार कोटींची संपत्ती वाद 2004 पासून
> 3 जुलै 2004 रोजी प्रियंवदा बिर्ला यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृत्युपत्र वाचल्यावर वादाची ठिणगी पडली. या मृत्युपत्रानुसार त्यांनी आपल्या सगळ्या संपत्तीचा वारस म्हणून चार्टर्ड अकाउंटंट आर. एस. लोढा यांचे नाव लिहिले होते.
> 13 जुलै रोजी बिर्ला कुटुंबीयांच्या वतीने लक्ष्मीदेवी नेवार व राधा मेहता यांनी लोढा यांच्या विरोधात स्थगिती मागितली.
> 21 जुलै रोजी प्रियंवदा यांचे दुसरे एक मृत्युपत्र सापडले. यावर लोढा यांनी स्थगिती मागितली.
> 2008 मध्ये लोढा यांचे निधन झाल्यानंतर हा वाद मिटेल असे वाटले, पण वाद वाढतच गेला. 2012 मध्ये दोन्ही पक्षांकडून कोर्टात नवे पुरावे सादर. त्यात प्रियंवदा बिर्ला यांच्या वैद्यकीय अहवालाचाही समावेश होता.


सर्वात श्रीमंत भावांमध्ये वाटणीची कटुता
वाद : 2002 पासून (वडील धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर)

>धीरुभाई अंबानी यांनी उत्तराधिकारीपदाच्या जबाबदारीबाबत काहीही स्पष्ट केले नसल्याचा खुलासा लेखक हेमिश मेक्डोनाल्ड यांनी आपल्या ‘अंबानी अँड सन्स’ या पुस्तकात केला आहे.
>2002 नंतर मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष झाले.
> 2004 मध्ये अनिल यांनी आपला हक्क मागितला तेव्हा दोन्ही भावांतील वाद जगजाहीर झाला. आई कोकिळाबेन यांनी दोन्ही भावांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण 2006 मध्ये वाटण्या झाल्याच.
> त्यानंतरही वाद सुरूच राहिले. अनिल यांच्या कंपनीने दक्षिण आफ्रिकेतील एमटीएन कंपनीशी कराराची बोलणी सुरू केली, तेव्हा मुकेश कंपनीवर हक्क सांगू लागले. कावेरी खो-यातून मिळणा-या गॅसवरूनही दोन्ही भावांत कोर्टात वाद सुरू.


पॉल यांच्या संपत्तीसाठी भाऊ, पुतणे वाद
वाद : 2011 मध्ये जीत पॉल यांच्या निधनाला तीन वर्षे झाल्यावर

> कोलकात्यातील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक. चहाचे मळे, पार्क हॉटेल, शिपिंग कंपनी अशा अनेक उद्योगांचे मालक जीत पॉल यांचे 2009 मध्ये निधन झाले.
>त्यांनी मृत्युपत्र लिहिले नसल्याचा गैरसमज. त्यांना मूलबाळ नसल्याने त्यांचे भाऊ व पुतणे यांच्यात संपत्तीचे वाटप होणार होते.
>तीन वर्षांनंतर त्यांच्या खासगी कागदपत्रांत एक मृत्युपत्र सापडले. त्यामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती धाकटा भाऊ सुरेंद्र पॉलची पत्नी शिरीन व सुरेंद्रची मुले करण, प्रिया व प्रीती यांना देण्याचा उल्लेख आढळला.
>यावर जीत पॉल यांचे मोठे भाऊ सत्या पॉल यांची मुलगी बेरलिया हिने कोर्टात धाव घेत, या मृत्युपत्राची सत्यता पडताळण्याची विनंती करत, कंपनीत आपला हक्क मिळावा, अशी मागणी केली आहे.