Wammy Desire 3
गॅजेट डेस्क - स्मार्टफोन मेकर Wickedleak ने
आपला नवा 3G व्हॉईस कॉलिंग टॅबलेट वॅमी डिझायर 3 लॉन्च केला आहे. या टॅबलेटची किंमत कंपनीने 5990 रुपये एवढी ठेवली आहे. 7 इंचाची स्क्रीन असलेल्या या टॅबलेटमध्ये अँड्रॉइड किटकॅट 4.4 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.
हा टॅबलेट केवळ कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवरूनच विकत घेता येईल. मागील काही दिवसांपासून व्हॉईस कॉलिंग टॅबलेटमध्ये सेगमेंटमध्ये अनेक नवा गॅजेट आले आहेत. Wickedleak कंपनी स्थानिक बाजारातील स्मार्टफोन कंपन्यांसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. स्पाइव्ह, मरक्युरी यांसारख्या कंपन्या खुपच कमी किंमतीत व्हॉईस कॉलिंग टॅब लॉन्च करत आहे. त्यामुळे युजरसाठी बाजारामध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, वॅमी डिझायर 3 चे फीचर्स-