आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8490 रुपयांत लॉन्च झाला ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 13 MP चा Wammy Neo

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या मे महिन्यात लॉन्च झालेला ऑक्टा-कोर प्रोसेसरने अद्ययावत बजेट स्मार्टफोन 'Wammy Neo Youth' विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. Wammy Neo ची प्री-बुकिंग आजपासून (15 जुलै) झाली असून किंमत 8490 रुपये आहे. 5 इंचाच्या फुल HD स्क्रीनने हा फोन परिपूर्ण आहे.

मार्केट ट्रेंड पाहता क्वाड-कोर प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोन्सला Wammy Neo शी स्पर्धा करावी लागणार आहे. क्वाड-कोर प्रोसेसर असलेल्या बहुतांश फोनची किंमत 10 हजार रुपयांच्यावर आहे. तर दुसरीकडे 8500 रुपयांच्या रेंजमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर फीचर असलेला Wammy Neo युजर्सचे लक्ष वेधून घेण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे या रेंजमध्ये 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा देत असलेला हा पहिलाच फोन आहे.

मुंबईतील कंपनी 'WickedLeak'ने आपला पहिला बहुचर्चित वाटरप्रूफ फोन लॉन्च केला होता. 'WickedLeak Wammy X' नामक फोनने ब्रांडेड स्मार्टफोन मेकर्स आव्हान दिले होते. अनेक लेटेस्ट फीचर्ससह हा फोन बाजारात दाखल झाला आहे. अल्पावधीत लोकप्रियता मिळवलेली ही कंपनी लवकरच 'मायक्रोमॅक्स'च्या नव्या स्पर्धकाच्या रुपात समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, Wammy Neo चे स्मार्ट फीचर्स...