आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Windows 10 Launch: Microsoft Launched New Os With Various Features

Internet Explorer संपुष्टात, निःशुल्क मिळेल MS Windows10, वाचा फिचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विंडोज 10 चा कन्झ्युमर प्रिव्ह्यू एका मोठ्या इव्हेंटमध्ये लॉंच झाला. लंडनमध्ये सकाळी 9 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार काल रात्री 10.30 वाजता) हा इव्हेंट सुरु झाला. पीसी, मोबाईल आणि टॅबलेटमध्ये समान दुवा तयार करण्याचे काम विंडोज 10 करणार आहे. मायक्रोसॉफ्टचा अॅप स्टोअर आता केवळ स्मार्टफोन आणि टॅबलेटसाठी राहिले नसून आता विंडोज स्टोअरमध्ये असलेले अॅप आता टेस्कटॉपवरही वापरता येतील. त्याचा विंडोज 10 मध्ये वापर करता येईल.
असेल फ्री अपग्रेड
विंडोज 7, विंडोज 8.1 किंवा विंडोज फोन 8.1 ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या सिस्टिमवर विंडोज 10 फ्री अपग्रेड करता येईल. मायक्रोसॉफ्टच्या वतीने घेण्यात आलेला हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. हे अपग्रेड केवळ एका वर्षासाठी फ्री असेल. यामुळे कंपनीच्या धोरणांमध्ये हळूहळू बदल होत असल्याचे दिसून येते.
Xbox One:
या इव्हेंटमध्ये गेमिंग कंसोल Xbox One यावरही चर्चा झाली. विंडोज 10 सोबत कम्पॅटिबल Xbox वन आता फुली ऑटोमेटेड पीसीसारखा काम करेल, असेही कंपनीने सांगितले.
स्टार्ट मेन्यू
विंडोज 10 च्या डेस्कटॉप वर देण्यात आलेल्या स्टार्ट मेन्यू विंडोज 7 सारखा उपयोगी आणि विंडोज 8 सारख्या टाईल्स फंक्शन असलेला आहे. विंडोज 8 फेमस न होण्यामागचे नेमके कारण स्टार्ट मेन्यू नसणे समजले जाते.
नवीन वेब ब्राऊझर
विंडोज 10 सोबत मायक्रोसॉफ्टने जुने वेब ब्राऊझर इंटरनेट एक्सप्लोरर याच्या जागी स्पार्टन सादर केले आहे. यात नवनवीन सुविधा देण्यात आल्या आहेत. हे एक्सप्लोररचे अपडेटेड व्हर्जन आहे.
3D ग्लास :
या इव्हेंटमध्ये मायक्रोसॉफ्टने होलोग्राम नावाच्या एका 3D हॅंडसेटचा प्रोटोटाइपही सादर केला. सध्या या प्रोजेक्टवर काम सुरु आहे. गुगुल क्लासला टक्कर देण्यासाठी हा ग्लास तयार करण्यात येत आहे. यातून 3D इमेज दिसतील.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, विंडोज 10 चे फिचर्स...