आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Windows 9 Preview Release And Know About All Windows Version

30 सप्टेंबरला Windows 9 ची पहिली झलक; जाणून घ्या, Windows मध्ये आतापर्यंत कसे झालेत बदल...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायक्रोसॉफ्टची लोकप्रिय ऑपरेटींग सिस्टीम Windows 9 लवकरच बाजारात येणार आहे. मायक्रोसॉफ्टने या नव्या विंडोजचे नाव थ्रेशहोल्ड असे ठेवले असून 30 सप्टेंबरला Windows 9 चे प्रीव्ही कंपनी रिलिज करणार आहे. हा प्रिव्यू लोकांना आरामात उपलब्ध होईल, तसेच Windows 9 चे व्यावसायिक व्हर्जन 2015 च्या मध्यापर्यंत लॉन्च केला जाईल.
मायक्रोसॉफ्टच्या एका इव्हेंटदरम्यान 30 सप्टेंबरला या नव्या Windows चे प्रिव्हूय लॉन्च करण्यात येईल. Windows 9 मध्ये कोरटाना व्हर्जनचाही समावेश असेल अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मायक्रोसॉफ्टने यापूर्वी 2011 ला कंपनीचे बहूचर्चीत Windows 8 ऑपरेटींग सिस्टीम लॉन्च केली होती. ही ऑपरेटींग सिस्टीम खुपच लोकप्रिय झाली. तसेच नोकीयाच्या लुमिया सिरिजमध्येही याच ऑपरेटींग सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे.
कंपनीने Windows 8 चे प्रिव्ह्यू फेब्रूवारी 2012 मध्ये रिलिज केला होता. मात्र ही ऑपरेटींग सिस्टीम लोकांपर्यंत पोहोचायला 2012 चा ऑक्टोबर महिना उजाडला होता. त्यामुळे सर्वांनाच Windows 9 बद्दल उत्सूकता आहे, की हे व्हर्जन लोकांपर्यंत कधीपर्यंत पोहोचेल. यासोबतच Windows 9 चे मोबाईल व्हर्जनसुध्दा बाजारात येईल. त्यामुळे मायक्रोसॉफ्टची ही आधुनिक ऑपरेटींग सिस्टीम 2015 च्या सुरूवातीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, मायक्रोसॉफ्टच्या आतापर्यंतच्या ऑपरेटींग सिस्टीम...