कॉम्‍प्‍युटरमध्‍ये विंडोज वापरत / कॉम्‍प्‍युटरमध्‍ये विंडोज वापरत असाल तर हे जरूर वाचा

Apr 14,2012 04:53:14 PM IST

ज्‍या व्‍यक्‍ती आपल्‍या कॉम्‍प्‍युटर किंवा लॅपटॉपवर विंडोज एक्‍सपी वापरतात त्‍यांना मायक्रोसॉफ्टने इशारा दिला आहे. विंडोज एक्‍सपी वापरत असलेल्‍यांनी लवकरच विंडोज व्हिस्‍टा किंवा विंडोज 7 नी ऑपरेटींग सिस्‍टीम अपडेट करावे. कारण येत्‍या दोन वर्षांत विंडोज एक्‍सपी ऑपरेटींग सिस्‍टीम पूर्णपणे आऊटडेटेड होणार असल्‍याची माहिती कंपनीने दिली आहे. एका ब्‍लॉगवर कंपनीने ही माहिती दिली आहे. ठराविक वेळेनंतर कॉंम्‍प्‍युटरमध्‍ये समस्‍या आल्‍यास मायक्रोसॉफ्ट जबाबदार राहणार नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. कंपनीने विंडोज एक्‍सपी बरोबर विंडोज 2003 सुद्धा अपग्रेड करण्‍याचा सल्‍ला दिला आहे. आठ एप्रिल 2014 पासून दोन्‍ही ऑपरेटींग सि‍स्‍टीमने कॉम्‍प्‍युटरचे डिवाईस चालू शकणार नाहीत.X