आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Within 3 Years V Store Starts 800 Store Say Vital's Jyoti Narayan

तीन वर्षांत 800 व्ही स्टोअर सुरू करण्याचा व्हिटल चे ज्योती नारायण यांचा संकल्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आर्थिक उदारीकरणानंतर देशात व्यापाराचे अनेक मार्ग सुरू झाले आहेत. त्यात बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) आणि नॉलेज प्रोसेस आऊटसोर्सिंग (केपीओ) प्रमुख आहेत. त्या क्रमवारीत मार्केट प्रोसेस आऊटसोर्सिंगचे (एमपीओ) नावही समाविष्ट होते. गुडगावची कंपनी व्हिटल सी मार्केटिंग लिमिटेडने आपल्या व्ही स्टोअरच्या माध्यमातून नव्या क्षेत्रात चांगलीच घोडदौड सुरू केली आहे. ऑक्टोबर 2011 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने अजून मोठी वाटचाल केली नसली तरी अल्पकाळातच कंपनीने केलेली प्रगती निश्चितपणे उल्लेखनीय आहे. ‘बिझनेस भास्कर’ ने व्हिटल सीचे कार्यकारी संचालक ज्योती नारायण यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्याचा हा सारांश.
एमपीओ शब्द भारतीय बाजारासाठी अपेक्षेप्रमाणे नवीन आहे. यात काम नेमके काय असते?
परदेशी बाजारपेठेत एमपीओची अगोदरपासूनच अंमलबजावणी होत आहे. ही प्रक्रिया आता आम्ही संपूर्ण भारतात लागू करत आहोत. एका मोठ्या फर्ममध्ये छोट्या-छोट्या कंपन्या जोडलेल्या असतात. छोट्या कंपनीने उत्पादीत केलेल्या मालाचे विपणन, विक्री आणि जाहिरात करण्याची जबाबदारी मोठ्या फर्मची असते. लघु उद्योग क्षेत्र (एमएसआय) उत्पादनात अग्रेसर असल्याचे आपण नेहमीच पाहत आलो आहोत. परंतु मार्केटिंग आणि विक्रीमध्ये मागे असतो. त्यामुळे एखाद्या चांगल्या उत्पादनाला बाजारपेठ मात्र उपलब्ध होत नाही. हीच सेवा आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ. त्याचबरोबर त्यांची जाहिरातदेखील करू. या सर्व प्रक्रियेलाच एमपीओ म्हटले जाते.
एमपीओ फर्म सुरू करण्या अगोदर याविषयी आपणास अनुभव होता?
फर्म सुरू करण्यापूर्वी या व्यवसायाशी माझा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. पहिल्यांदा मी पर्ल समूहाशी जोडलेलो होतो. 1999 पासून पर्ल समूहात होतो. त्या ठिकाणी पर्ल क्रिएटिव्ह, पर्ल टूरिझम, पर्ल इन्फ्रास्ट्रक्चर आणि एक वृत्त वाहिनी पी-7 लाँच केले होते. पी-7 लाँच करतेवेळीच एमपीओचा विचार माझ्या मनात येत होता. आॅक्टोबर 2011 मध्ये तो विचार वास्तवात उतरला. देशभरातील लघुउद्योग क्षेत्रातील सर्व कंपन्यांना चांगली संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व्हिटल सीची स्थापना करण्यात आली.
तुमच्याशी जोडल्यानंतर त्यांचा व्यवसाय वाढणार आहे. ही झाली व्यवसायाची गोष्ट. परंतु यातून ग्राहकांचा काय फायदा?
ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान मिळवून देणे हेच व्हिटल सीचे मिशन आहे. कंपनीने आपल्या व्यवसायात वैविध्य ठेवले आहे. उत्पादनांनी मल्टी ब्रँड रिटेलमध्ये प्रवेश केला आहे, आम्ही आपला व्ही ब्रँड लाँच केला आहे. त्यातून प्रायव्हेट लेबल ब्रँड उपलब्ध करून दिले जातील. आम्ही आमचे स्टोअर केवळ महानगर, मोठ्या शहरांतच सुरू केले असे नव्हे तर ग्रामीण भागापर्यंत त्याचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे.
कुठपर्यंत पोहचले स्टोअरचे काम?
आम्ही सुमारे एक वर्षापूर्वी त्याला लाँच केले आहे. परंतु खरे सांगायचे तर त्यावर गेल्या पाच-सहा महिन्यापासून काम सुरू झाले आहे. सध्या देशातील मेट्रो आणि इतर शहरात मिळून 70 स्टोअर सुरू झाले आहेत. लवकरच ही संख्या शंभराचाही आकडा पार करेल. आगामी तीन-चार महिन्यात आमचे स्टोअर गुडगावच्या एमजी रोड, दिल्लीच्या हरिनगसह बडोदा, चेन्नई, छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये दिसू लागतील.
स्टोअरची यूएसपी काय आहे?
तुम्ही आमचे स्टोअर्स बघा. ते सर्व एकसारखे दिसून येणार नाहीत. आम्ही जेथे स्टोअर सुरू करतो. तेथील बाजारपेठेचा अगोदर अभ्यास करतो. लोकांना तेथे नेमके काय हवे आहे, हे आम्ही पाहतो. त्यांची क्रयशक्ती काय आहे, हे जाणून घेतली जाते. त्या भागातील इतर स्टोअर्समध्ये काय विकले जात आहे. हेदेखील आम्ही बघतो. म्हणजे आमच्या स्टोअरमधून तशी उत्पादने पुन्हा विकण्याचे आमचे धोरण नाही. इतर स्टोअरपेक्षा काही वेगळ्या वस्तू विकून नावीन्य कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
आपण त्याला भलेही एमपीओचे नाव द्या, परंतु हे रिटेलिंगच आहे. रिटेल सेक्टरमध्ये सध्या गळेकापू स्पर्धा आहे, त्यामध्ये आपण स्वत: ला कोठे पाहता ?
आमच्या उत्पादनाला लाँच करण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा विचार केला. पूर्ण तयारीसह मैदानात उतरलो आहोत. आगामी तीन वर्षांत 600 ते 800 स्टोअर सुरू करण्याचा संकल्प केला आहे.
स्टोअर कोणत्या राज्यांत असतील
आमचे स्टोअर सर्व राज्यांत असतील. गुडगावव्यतिरिक्त दिल्ली, चंदीगड, लखनऊ, मुंबई, बडोदा, पुणे, चेन्नई, रायपूर, जयपूर, पाटणा, कोलकाता येथेही कार्यालय सुरू केले आहे.