आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Within Five Years Inborn Rich Person Increases By Three Fold In Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील गर्भश्रीमंतांचे प्रमाण पाच वर्षांत तिपटीने वाढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आर्थिक मंदीच्या झळा बसत असतानाही देशातील अतिश्रीमंत व्यक्तींच्या संख्येमध्ये पुढील पाच वर्षांत तिपटीने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अतिश्रीमंतांची मालमत्ता 4.5 पटीने वाढून ती आर्थिक वर्ष 2018 पर्यंत 380 ट्रिलियन रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.


देशातील अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या 2012-13 वर्षात जवळपास 1,00,900 पर्यंत वाढल्याचा अंदाज असून पुढील पाच वर्षांत ती 3,29,00 पेक्षा जास्त होण्याचा अंदाज ‘कोटक महिंद्रा मॅनेजमेंट’ आणि ‘क्रिसिल रिसर्च’ यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या ‘टॉप ऑफ द पिरॅमिड’ अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.


देशातील गर्भश्रीमंतांची श्रीमंती 4.5 पटीने वाढून ती आर्थिक वर्ष 2013 मधील 86 ट्रिलियन रुपयांवरून आर्थिक वर्ष 2018 पर्यंत 380 ट्रिलियन रुपयांवर जाण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सध्याच्या आर्थिक मरगळीच्या वातावरणामध्ये अतिश्रीमंत व्यक्ती खर्च करण्याबाबत जास्त सावध भूमिका घेत आहेत. परंतु आर्थिक सुधारणा लवकरच होतील याबाबत या व्यक्ती मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जास्त आशावादी आहेत. स्वेच्छेने खर्च करण्याबाबत विशेषकरून अतिश्रीमंत व्यक्ती जास्त सावध झाल्या असल्याचे मत क्रिसिल रिसर्चचे अध्यक्ष मुकेश अगरवाल यांनी व्यक्त केले.


अतिश्रीमंत व्यक्ती तोलूनमापून खर्च करीत असल्या तरी दुस-या बाजूला लक्झरी घरे, खाद्यपदार्थ, कपडे, शिक्षण, पर्यटन, कौटुंबिक सहली याबाबत मात्र सढळ हाताने खर्च करणे कायम ठेवले असल्याचे अहवालात म्हटले आहे. स्थावर मालमत्ता खरेदी नियोजन व्यवसाय सध्या काहीसा बाल्यावस्थेत असला तरी त्यालाही हळूहळू महत्त्व येत असल्याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.


नियोजनाचे महत्त्व
घरातल्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या पश्चात स्थावर मालमत्तेच्या उत्तराधिकारीचा मार्ग सुकर करणे, भविष्यातील संभाव्य वादविवाद टाळण्यासाठी, आपल्यावर अवलंबून असलेल्यांच्या गरजा नीट पूर्ण व्हाव्यात यादृष्टीने अनेक अतिश्रीमंत व्यक्तींना आपल्या स्थावर मालमत्तेची सुनियोजित योजना आखणे महत्त्वाचे असल्याचे पटले आहे याकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.


गर्भश्रीमंत कोण
० गेल्या दहा वर्षांत किमान 250 दशलक्ष सरासरी निव्वळ मालमत्ता कमावलेल्या व्यक्ती
० बिगर शहरातील गर्भश्रीमंतांचे प्रमाण : 46 %