आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Within Five Years Indian's Proporty Double, Carvi Report

पाच वर्षांत भारतीयांची मालमत्ता दुप्पट होणार, कार्व्हीचा अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आर्थिक विकासाचा वेग जसजसा वाढेल त्या प्रमाणात भारतीयांच्या खासगी मालमत्तेतही वाढ होईल. यामुळे येत्या पाच वर्षांत भारतीयांची खासगी मालमत्ता दुपटीने वाढून ५१४ लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

मार्च २०१४ मधील चित्रानुसार, भारतातील लोकांकडे २५७ लाख कोटी रुपयांची वैयक्तिक मालमत्ता आहे. कार्व्ही प्रायव्हेट वेल्थ या संस्थेने आपल्या संशोधन अहवालात याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, २०१९ पर्यंत लोकांच्या खासगी संपत्तीत वार्षिक १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे अनुमान आहे.

कार्व्ही प्रायव्हेट वेल्थने या आपल्या अहवालात लोकांच्या जंगम व स्थावर मालमत्ता विचारात घेतल्या आहेत. यात जमीनजुमला, सोने, हिरेजवाहिर, चांदी आणि प्लॅटिनमचा समावेश आहे.
जंगम आणि स्थावर मालमत्ता : कार्व्हीचे प्रमुख सुनील मिश्रा यांनी सांगितले की, २०१३-१४ या वित्तवर्षापर्यंत देशांतील नागरिकांकडे एकूण २५७.४ लाख कोटी रुपयांची वैयक्तिक मालमत्ता आहे. यात त्यांची जंगम संपत्ती ही १३४.७ लाख कोटी रुपये (५२.३ टक्के) आणि स्थावर मालमत्ता १२२.७ लाख कोटी रुपये (४७.७ टक्के) आहे.

२२ हजार टन सोने
भारतीयांकडे तब्बल २२ हजार टन इतके वैयक्तिक सोने आहे. जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे.

५ वर्षांत ८४ टक्के वाढ : एकूण मालमत्तेत गेल्या एका वर्षात २७.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. जंगम संपत्ती पाच वर्षांत ८४ टक्क्यांनी वाढली आहे.

भारतीयांची गुंतवणूक कुठे अन् कशी
-सोने : २२ हजार कोटी रुपये
-रिअल इस्टेट : ५० लाख कोटी रुपये दुस-या, तिस-या घरांसाठी
-रिअल इस्टेट फंड व बिल्डर्सना कर्ज देऊन कमाई
-फिक्स्ड डिपॉझिट : २९ लाख कोटी रु.
-रोखे बाजार : २० टक्के संपत्ती
-विमा : १६ टक्के मालमत्ता
-पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज, किसान विकास पत्र आदी : ५.७५ लाख कोटी रुपये.

ठळक वैशिष्ट्ये
-आर्थिक वर्ष २०१४ मध्ये देशातील एकूण व्यक्तिगत संपत्ती अंदाजे २५७.४ लाख कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०१३ च्या तुलनेत २७.५ टक्क्यांनी वाढ.
-व्यक्तींकडे वित्तीय मालमत्ता स्वरूपात असलेल्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत ८४ टक्के वाढ.
-भारतीय व्यक्तिगत संपत्ती वार्षिक १४.०९ टक्के दराने वाढण्याची आणि येत्या पाच वर्षांत दुप्पट होण्याची शक्यता.
-व्यक्तींकडील वित्तीय मालमत्तांमधील संपत्ती येत्या चार वर्षांत दुप्पट होण्याची आणि वार्षिक १८.३ टक्के वाढण्याचा अंदाज. भौतिक मालमत्तांतील संपत्ती येत्या -पाच वर्षांत वार्षिक १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता.
-आर्थिक वर्ष २०१५ मध्ये मुदत ठेवींना मागे टाकत देशातील व्यक्तिगत संपत्तीमध्ये ‘डायरेक्ट इक्विटी’ हा सर्वाधिक योगदान देणारा एकटा माेठा संपत्तीवर्ग ठरेल आणि त्याचे स्थान कायम राहण्याचा अंदाज
-सेन्सेक्स २०२० पर्यंत १,००,००० अंकांची मजल गाठण्याचा अंदाज